मुंबईतील विक्रेत्यांना केले मास्क वाटप , नगर जिल्ह्यातील युवकाचे कार्य

Date:

।  मुंबई  । प्रतिनिधी ।

जगभरात कोरोना रोगाने थैमान मांडले असून या रोगापासून जनतेला सावध करण्याचे काम जेवढे केंद्र व राज्य सरकार करत असले तरी नगर जिल्हयातील निमगाव जाळी येथील व मुंबई येथे जोंधळे एज्युकेशनल संस्थेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख सागर जोंधळे यांनी आपल्या स्वखर्चातून मुंबई नगरीमध्ये मटन, मासे, फळभाजी विक्रेत्यांना मास्क वाटप करुन जनजागृतीची मोहीम राबवत आहे.
या रोगाचा सामना आपण करु शकतो, असेही ते या माध्यमातून सांगत आहेत.
या रोगाविषयी राबवित असलेले राज्य सरकार राबवित असलेले उपाययोजनांचा अहवाल सर न्यायाधीशांना सादर करण्यात यावा अशी मागणीही श्री. जोंधळे यांनी केली.
मुंबईमधील सर्व मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट, मटन मार्केट ज्या महिला व वृध्द तरुण यांना त्यांनी स्वखर्चाने मास्क वितरण करत या रोगापासून आपण बजाव करु शकता याबाबत त्यांनी त्यांना सॅनीटायझर याने पंधरा ते वीस मिनिटांनी हात स्वच्छ धुवून स्वच्छतेबाबत संदेश दिला.
या रोगापासून आपण ग्राहकांना देखील संदेश द्यावा असा सल्ला देखील जोंधळे यांनी दिला आहे. जगावर मोठे संकट ओढवले असले तरी देशाचे पंतप्रधान ते संपुर्ण जगातील राजकीय नेत्यांपासून सर्वांनीच या रोगाचा सामना करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
सामाजिक संघटनांनी देखील एकत्र न येता आपापल्या पध्दतीने या रोगाविषयी समाज प्रबोधन करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल राज्य भरात सर्वत्र कौतूक होत असून जोंधळे परिवाराने आजपर्यंत सामाजिक व शैक्षणिक कार्यात जो ठसा उमटविला तो ठसा आज जगावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचा प्रयत्न सागर जोंधळे यांनी दाखवून दिला आहे.
त्यांच्या या कौतूकास्पद उपक्रमाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ना. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, प्रसिध्द प्रमुख नवनाथ जाधव, कोकण विभाग प्रमुख भगवान चंदे यांसह राज्यभरातील पत्रकारांनी अभिनंदन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला चतु:शृंगी देवी मंदिर परिसर

राष्ट्रीय कला अकादमी आणि श्री चतु:शृंगी देवी देवस्थानच्या संयुक्त...

कुपोषणमुक्त मुंबईसाठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा-– पालकमंत्री अँड. आशिष शेलार

मुंबई, दि. 12 नोव्हेंबर 2026ज्या पद्धतीने एस.आर..ए ने झोपडपट्टी...

मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवण्याची धमकी:धमकीचा ई-मेल मिळताच यंत्रणा अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

पुणे- महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी...