पोलीस मित्र संघटनेचा उपक्रम; शहीद पोलीस अधिकारी, जवान आणि निरपराध नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन
पुणे : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना पोलीस मित्र संघटनेच्या वतीने बालगंधर्व चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
‘जरा याद करो कुर्बानी’ या उपक्रमांतर्गत देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांसह दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक रणजीत सिंह परदेशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, भाग्यश्री कुंभार, रणजितसिंह पाटील, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, चंद्रशेखर कपोते, सुभाष जेधे, मनीष सोनिग्रा, चैतन्य जगताप, सुमेधा मुठे, गणेश जाधव, अपूर्व खाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करत उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

