अभय योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हा – दिनेश अग्रवाल

Date:

पुणे परिमंडलातील ३५०७ ग्राहकांचे अर्ज; ६४८ ग्राहकांकडून ९४.३४ लाखांचा भरणा

पुणे, दि. २२ नोव्हेंबर २०२६ : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना थकबाकीमुक्त होऊन पुन्हा वीजजोडणी घेण्याची अभय योजनेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेत थकबाकीवरील १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ होणार असून, मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्यामुळे पुणे परिमंडलातील सर्व पात्र ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (वीज खरेदी) दिनेश अग्रवाल यांनी केले.   

महावितरणच्या अभय योजनेला पुणे परिमंडलात प्रतिसाद मिळत असून, शनिवारपर्यंत (दि. २१) एकूण ३ हजार ५०७ ग्राहकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ६४८ ग्राहकांनी ९४ लाख ३४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. रास्तापेठ शहर मंडलातील ६०९ ग्राहकांपैकी १६९ ग्राहकांनी २१.५३ लाख रुपये, गणेशखिंड शहर मंडलातील ७७० ग्राहकांपैकी २४६ ग्राहकांनी ४४.२४ लाख रुपये, तर पुणे ग्रामीण मंडलातील २ हजार १२८ ग्राहकांपैकी २३३ ग्राहकांनी २८.५७ लाख रुपयांचा भरणा केला आहे.      

पुणे परिमंडलातील अभय योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांनी शनिवारी (दि. २१) भोसरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी योजनेच्या प्रगतीचा तसेच ग्राहकांच्या सहभागाचा आढावा घेतला. यावेळी गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन गिते तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे परिमंडलातील गणेशखिंड, रास्तापेठ आणि पुणे ग्रामीण या तीन मंडलांमध्ये अभय योजनेसाठी २ लाख ८२ हजार ९७७ ग्राहक पात्र आहेत. यामध्ये २१२ उच्चदाब ग्राहकांकडे ७२.०६ कोटी रुपये, तर २ लाख ८२ हजार ७६५ लघुदाब व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे ४२५.९५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणने ही योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू केली आहे. मूळ थकबाकीच्या कालावधीनुसार १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असून, या विशेष ‘अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह’चा लाभ घेण्यासाठी संपूर्ण देय मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. एकरकमी भरणा शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी व्याजमुक्त हप्त्यांची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांनी मुदतीपूर्वी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रवाल यांनी केले.

 भोसरीत औद्योगिक ग्राहकाकडून ३८.३३ लाखांचा धनादेश

महावितरणचे कार्यकारी संचालक (वीज खरेदी) दिनेश अग्रवाल यांनी शनिवारी (दि. २१) इंद्रायणीनगर, भोसरी येथे थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एका औद्योगिक ग्राहकाने चालू थकीत वीजबिलापोटी अग्रवाल यांच्याकडे ३८ लाख ३३ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

मंडलनिहाय प्रतिसाद
मंडलअर्ज केलेले ग्राहकभरणा केलेले ग्राहकभरणा रक्कम रास्तापेठ शहर ६०९१६९२१.५३ लाख रुपये, गणेशखिंड शहर ७७०२४६४४.२४ लाख रुपये,पुणे ग्रामीण २१२८२३३२८.५७ लाख रुपये,पुणे परिमंडल एकूण३५०७६४८९४.३४ लाख रुपये
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशासनाच्या इभ्रतीचा सवाल! अतिरिक्त आयुक्त पवनीत कौरही उतरल्या रस्त्यावर; गंगाधाममधील अतिक्रमणांमागील राजकीय वरदहस्ताची चर्चा!

महापालिकेच्या जागेवर पथारीवाल्यांना जागा देऊन कथित भाडेवसुली? सत्ताधारी नगरसेवकाच्या...

कोयनेचे समुद्रात जाणारे ६७ टीएमसी पाणी आता मुंबईकडे वळवणार? राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव!

मुंबईच्या भविष्यातील पाणीटंचाईवर मोठा उपाय ठरण्याची शक्यता; भुयारी बोगदे...

‘पुण्याचा आपला आयुक्त’ म्हणत आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव; बालगंधर्व चौकात झळकले भव्य होर्डिंग!

‘पुण्याला आपलं घर मानणारा, पुणेकरांसाठी निर्मळ आणि निस्वार्थी मनाने...

राजाराम पुलाजवळील पाणंद रस्ता होणार ५० फूट रुंद; सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर कामाचे भूमिपूजन!

वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा; नगरसेवक स्वप्नील दुधाने...