लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीत;रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Date:

पुणे: लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून महाराष्ट्रात आणण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक ‘वाघनखे’ पुणे येथील शिवप्रेमी आणि नागरिकांना पाहण्यासाठी पुण्यात प्रदर्शनास ठेवावीत, अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांना निवेदन पाठवून ही मागणी लावून धरली आहे.

राज्य शासनाच्या सध्याच्या नियोजनानुसार ही ऐतिहासिक वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, या संपूर्ण वेळापत्रकात पुणे शहराचा समावेश नसल्याने पुणेकरांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीची भावना आहे.
या मागणीबाबत बोलताना राहुल डंबाळे म्हणाले की, “पुणे ही स्वराज्याची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा आणि पराक्रमाचा इतिहास या मातीशी जोडलेला आहे. पुण्यात देशभरातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले लाखो तरुण, विद्यार्थी आणि स्थानिक शिवभक्त राहतात. प्रत्येकाला मुंबईला जाऊन ही वाघनखे पाहणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने लंडनच्या संग्रहालयाशी विशेष पाठपुरावा करून पुण्यातही या वाघनखांचे प्रदर्शन भरवावे, जेणेकरून पुणेकरांना आपल्या राजाच्या पराक्रमाचे प्रतीक जवळून पाहता येईल.”

पुण्यातील सुरक्षित आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन केल्यास लाखो शिवभक्तांना त्याचा लाभ घेता येईल, असेही डंबाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरुडमध्ये १००० हून अधिक चिमुकल्यांचा अनोखा बालदिन सोहळा; सुरक्षित मातृत्वाचा आनंदोत्सव!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतील ‘सखी-सुखदा’ उपक्रमातून एक हजाराहून अधिक...

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कारांचे वितरण

मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे : भारत सासणे पुणे...

आपुलकीच्या दिवाळीने श्रीवत्समधील मुलांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

विविध गुणदर्शन कार्यक्रमातून चिमुकल्यांनी सादर केले कलागुण; शनिवार पेठ...