११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह– मंत्री ॲड आशिष शेलार

Date:

मुंबई, दि. १२ नोव्हेंबर : 2026
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर ‘भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात अनुसूचित जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताहात १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, महिला बचत गटांना लाभ देणे तसेच नवीन अर्ज स्वीकारणे व मंजूर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव आयोजित करण्यात येईल. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला जिल्हा स्तरावर तसेच आदिवासी भागातील मंडळांमध्ये पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. याच दिवशी गडचिरोली येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी आदिवासी समाजाशी संबंधित संत-महंतांचा सन्मानही करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी आधारकार्ड व विविध शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरे, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे, तर १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी महिला बचत गटांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमही आयोजित केले जातील, अशी माहिती

आदिवासी समाजाच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण निर्णय

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी पदभरतीवरील निर्बंध असल्याने तात्पुरत्या स्वरुपात आश्रमशाळांमध्ये तीन हजारांहून अधिक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये परिचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वीर रघोजी भांगरे यांच्या नावाने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमिकरण योजना सुरू करण्यात आली आहे. उमेद आणि महिला बचत गटांच्या धर्तीवर या योजनेची आखणी करण्यात आली आहे.

आदिवासी शाळांमध्ये कला, क्रीडा आणि संगीत या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आदिवासी बांधवांच्या लोकसंख्येचे आणि त्यांच्या गरजांचे योग्य आकलन व्हावे, यासाठी २०११ च्या जनगणनेच्या आधारे सर्वेक्षण करण्यात आले. कोलाम, कातकरी आणि माडिया या विशेष मागास जमातींच्या विकासासाठी तसेच पारधी या मागास व स्थलांतरित जमातीच्या उन्नतीसाठी विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदिवासी संस्कृती, प्रथा, परंपरा आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर अध्ययन केंद्र सुरू करण्याचाही निर्णय झाला आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) आणि पदभरतीसंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, यासह विविध उपाययोजनांची माहिती मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी यावेळी सविस्तरपणे दिली.

मुंबई उपनगरात पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पर्यावरण आणि वृक्षलागवडीच्या विषयावरही आज महत्त्वाची आढावा बैठक मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतले. राज्य सरकारने पुढील २० वर्षांत ३०० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी स्वतंत्र आयोग आणि रोपवाटिका निर्माण करण्यासारखे निर्णय घेतले आहेत. या उपक्रमात मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत माहिती देताना ॲड आशिष शेलार यांनी सांगितले की, मुंबई उपनगर जिल्ह्यात पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख १२ हजार ३९० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सरकारी उपलब्ध जागांचा शोध घेऊन जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १ लाख ६० हजार, आरे परिसरात २० हजार, राज्य राखीव पोलीस दलाच्या क्षेत्रात ५ हजार, कृषी उद्योग विकास महामंडळाच्या जागेत २६५, केंद्रीय कुक्कुटपालन केंद्राच्या परिसरात ३ हजार ५०० आणि एमएमआरडीएच्या क्षेत्रात १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवडीसोबत वृक्षसंवर्धनावरही भर देण्यात येत असून केवळ वृक्षलागवड करून थांबायचे नाही, तर लावलेली झाडे जगली पाहिजेत आणि त्यांची वाढ झाली पाहिजे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड, जिओ मॅपिंग आणि वृक्षांच्या वाढीचा नियमित आढावा घेण्यावर भर दिला जात आहे.

मुंबई उपनगरातील वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाच्या या मोहिमेत संबंधित यंत्रणांसोबतच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. पर्यावरणाविषयी नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुयोग मित्र मंडळाने साकारली जेजुरी गडाची प्रतिकृती

पुणे : गोखलेनगर येथील सुयोग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या...

दहा हजार दिव्यांनी उजळल्या ऐतिहासिक वास्तू

पुणे : धर्मवीरगड, तिकोना गड, लाल महाल आणि सपिंडेश्वर...

ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला अन्नकोटाचा महानैवेद्य

दीपावली पाडव्यानिमित्त मंदिरात भरतनाट्यम चे सादरीकरणपुणे : ग्रामदैवत श्री...

कोथरूडच्या वस्ती भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर चंद्रकांतदादांनी फुलवला दिवाळीचा आनंद!

कुटुंबीयांना फराळ, लहान मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप; दुष्काळग्रस्तांना...