ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला अन्नकोटाचा महानैवेद्य

Date:

दीपावली पाडव्यानिमित्त मंदिरात भरतनाट्यम चे सादरीकरण
पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त अन्नकोटाचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गाभाऱ्यासह मंदिरात केलेली आकर्षक सजावट आणि अन्नकोट पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

अन्नकोटामध्ये गोवर्धन पर्वत सजावटीसह चिवडा, चकली, काजू,बदाम पिस्ते,अनारसे, कडबोळी, शंकर पाळी, केळी, खव्याच्या पोळ्या असे मिष्टान्न मांडण्यात आले होते. मंदिरात दीपावली निमित्त दररोज सकाळी व सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पाडव्या निमित्त अन्नकोट आणि भरतनाट्यम कार्यक्रम देखील पार पडला. तसेच सकाळी दिवाळी पहाटनिमित्त सुगम संगीताचा कार्यक्रम होता. कार्यक्रमांचे आयोजन देवस्थानचे खजिनदार व सांप्रत पुजारी हेरंब ठकार आणि अश्विनी हेरंब ठकार यांनी केले. यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुयोग मित्र मंडळाने साकारली जेजुरी गडाची प्रतिकृती

पुणे : गोखलेनगर येथील सुयोग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या...

दहा हजार दिव्यांनी उजळल्या ऐतिहासिक वास्तू

पुणे : धर्मवीरगड, तिकोना गड, लाल महाल आणि सपिंडेश्वर...

कोथरूडच्या वस्ती भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर चंद्रकांतदादांनी फुलवला दिवाळीचा आनंद!

कुटुंबीयांना फराळ, लहान मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप; दुष्काळग्रस्तांना...