साताळा बु. ता. उदगीर गावातील निकृष्ट पाणीपुरवठा कामाची चौकशी करून दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार दिवाळी फराळ वाटप; डॉ. गोऱ्हे यांचा ग्रामस्थांशी व्हिडिओ संवाद

उदगीर, लातूर : उदगीर तालुक्यातील साताळा बु. गावातील पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच गावातील पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि जलधारा योजनेतील समावेशाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार साताळा गावात दिवाळीनिमित्त महिलांसाठी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. या उपक्रमासाठी आपल्या आमदार मानधनातून आर्थिक योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी सुमारे १० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ७० टक्के काम होऊनही गावाला १५-१५ दिवस पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. पाइपलाइन वारंवार फुटणे, निकृष्ट साहित्याचा वापर आणि अपूर्ण कामाबाबतही तक्रारी मांडल्या. यावर चौकशी अहवालानुसार संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले. यासंदर्भात विभागीय आयुक्तांना यापूर्वीच पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.

साताळा बु. गावाचा जलधारा योजनेत समावेश करण्यासाठी पुढील आठ दिवसांत प्रयत्न करण्यात येतील. तसेच जनावरांच्या चाऱ्याबाबत उदगीर तहसीलदारांकडे तातडीने विचारणा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गावातील प्रश्नांसाठी महिला व पुरुषांची संयुक्त समिती स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

“मी पूर्वी उदगीरमध्ये वास्तव्यास होते. माझ्या छोट्या मुलीचा जन्मही उदगीरमध्ये झाला आहे. त्यामुळे या भागाशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. तुमच्या प्रश्नांसाठी माझा पाठपुरावा कायम राहील,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार विनायकराव पाटील, संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेगेटोळं, विधानसभा प्रमुख अनिल पंचाक्षरी, महिला संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, सरपंच कुसुम तिरकोळे, चेअरमन पद्मसिंह पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यांनी नियोजन केले होते. कार्यक्रमात सुमारे २०० महिला व १५० ते २०० पुरुष सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘गोकुळ’वर अखेर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील नवे अध्यक्ष; सतेज पाटलांना मोठा धक्का

१६ विरुद्ध १३ मतांनी महायुतीची बाजी; निवडून आलेल्या संचालकांमध्ये...

शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी प्रयत्न करू; आ. नीलम गोऱ्हे

शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनात २५० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रे पुणे: शस्त्रांची...

रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी! वाढत्या आगीच्या घटनांनंतर महापालिकेचा मोठा निर्णय

दिवाळीच्या दिवशी आगीच्या १४२ वर्दी; त्यापैकी १३७ घटना फटाक्यांशी...

‘ अराजकवादी कोण? आम्ही कि तुम्ही ’ मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

‘गोकुळ’वर सत्तेच्या जोरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न; भाजपकडून लोकशाही मूल्यांची...