‘आयएनएस सूरत’ मस्कत येथे दाखल

Date:

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर  2026

भारतीय नौदलाचे आयएनएस ‘सूरत’ हे जहाज  भारत आणि ओमानचे शाही नौदल यांच्यातील द्विपक्षीय सागरी सराव ‘नसीम अल बहर’ च्या 15 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आणि त्यानंतरच्या समन्वयीत गस्तीसाठी 8 नोव्हेंबर 2026 रोजी ओमानमधील मस्कत येथे पोहोचले.

या सरावामध्ये बंदर आणि सागरी टप्प्यांदरम्यान व्यावसायिक सरावांचा समावेश असेल, ज्यामध्ये परस्परांच्या जहाजांवर भेटी, परिचालनात्मक संवाद आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. सरावातील या उपक्रमांमुळे दोन्ही नौदलांच्या जवानांना आपापल्या अनुभवांची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची, आंतरपरिचालनक्षमता वाढवण्याची आणि परस्पर समज वाढवण्याची संधी मिळेल.

बंदराला भेट देण्याचा हा उपक्रम भारत आणि ओमानमधील  जुन्या संबंधांवर आधारित असून तो दोन्ही देशांदरम्यान मजबूत आणि चिरकाल टिकणाऱ्या सागरी भागीदारीला अधोरेखित करत आहे. भारत सरकारच्या ‘महासागर’ म्हणजेच प्रदेशांच्या सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती   या दृष्टीकोनाशी तो सुसंगत आहे आणि 24 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या संयुक्त लष्करी सहकार्य समितीच्या 13 व्या बैठकीदरम्यान निर्माण झालेल्या गतिशीलतेला चालना देण्याची संधी प्रदान करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे रेल्वे स्थानकावर तिकीट काळाबाजाराचा आरोप; ८०० रुपयांचे तिकीट २ हजारांना, तर एसी तिकीट ६ हजारांपर्यंत!

रेल्वे अधिकारी-कर्मचारी आणि दलालांच्या संभाव्य संगनमताची उच्चस्तरीय चौकशी करा;...

कर्करोगाच्या औषधांच्या किमतीत मोठी कपात! १,३६४ औषध फॉर्म्युलेशन्सचे नवे दर आजपासून लागू

६७९ ब्रँडच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक घटल्या; काही औषधांच्या...

पुण्यात फटाक्यांचा आगडोंब! अवघ्या १६ तासांत आगीच्या ९४ वर्दी; अग्निशमन दलाची रात्रभर धावपळ

लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत आगीच्या घटनांची मालिका;...

दिवाळीच्या जल्लोषात १४२ ठिकाणी आग; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

फटाक्यांमुळे देशभरात दुर्घटनांचे सत्र; मुंबईत १३७ आगींचे कारण फटाके,...