लक्ष्मीपूजनाला श्री महालक्ष्मी देवीला सुवर्णसाडी व मुकुट परिधान  

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; वर्षातून दोन वेळा योग

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी आणि सुमारे २ किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला रत्नजडित मुकुट परिधान करण्यात आला. वर्षातून दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजन या दिवशी देवीला ही साडी परिधान करण्यात येते. त्यामुळे सुवर्णवस्त्रांनी सजलेले हे महालक्ष्मी देवीचे रूप पाहण्यासोबतच दर्शनाकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

दिवाळीच्यानिमित्ताने मंदिराचे प्रवेशद्वार आणि सभामंडपासह संपूर्ण मंदिर परिसरात विविध प्रकारची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, निलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याचे आयोजन केले आहे.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, हैद्राबाद मध्ये साडीची कलाकुसर साकारण्यात आली असून सुमारे ६ महिने काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करून ही साडी देवीसाठी साकारण्यात आली आहे. तसेच सुमारे २ किलो सोन्याच्या मुकुटावर करण्यात आलेले अतिशय सुबक आणि नाजूक नक्षीकाम हे विशेष लक्षवेधी आहे. पारंपरिक धार्मिक संकल्पना, उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्य यांचा सुंदर संगम या मुकुटामध्ये पाहायला मिळतो. दसऱ्याच्या निमित्ताने भाविकांसाठी हा सुवर्ण मुकुट विशेष आकर्षण ठरत असून, श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आणखी एक दिव्य आणि वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुष्काळी आपत्तीचा सामना आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर

नागपूर, दि. ७:  कुठलेही संकट अथवा आपत्ती आल्यास तिचा...

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

मुंबई- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व...

तवांग, अरुणाचल प्रदेशमधील शाक्यमुनि बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे 31,000 भक्तांनी घेतले आशीर्वाद

तवांग मठातील सात दिवसांच्या प्रदर्शनाचा 7 नोव्हेंबर रोजी समारोप;...

दिवाळीनिमित्त २० क्विंटल फुलांनी सजले केदारनाथ मंदिर; देशभरात दीपोत्सवाचा उत्साह!

केदारनाथ धाममध्ये आकर्षक पुष्पसजावट, अयोध्येत लाखो दिव्यांची रोषणाई; राष्ट्रपती,...