ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ आता OTT वर पाहता येणार; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

Date:

चित्रपटगृहात जाऊन प्रहार पाहायचा राहून गेला असेल, आपल्या लाडक्या ललितला कसाबच्या भूमिकेत पाहायचे राहून गेले असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. आता प्रहार हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे.

सलाम पुणे पुरस्कार विजेता अभिनेता ललित प्रभाकर, राजकुमार राव यांचा ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

‘प्रहार’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अविनाश अरूण यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव याने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे, तर ललित प्रभाकर याने कसाबची भूमिका साकारली आहे. याशिवाय इतरही दमदार कलाकारांची फळी आहे. उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यातील गाजलेल्या खटल्यापैकी हा एक खटला आहे.

‘प्रहार’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. जीक्यू इंडियाच्या वृत्तानुसार चित्रपटाच्या सुरूवातीच्या क्रेडिट्समध्ये नेटफ्लिक्सचा लोगो दिसतो. त्यामुळे नेटफ्लिक्स हे या चित्रपटाचं डिजीटल व्यासपीठ असण्याची शक्यता आहे. मात्र निर्माते आणि नेटफ्लिक्स या दोघांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

साधारणपणे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी चित्रपट OTT वर येतात. याच अंदाजानुसार ‘प्रहार’ 27 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2026 या कालावधीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊ शकतो. मात्र ही तारीख निश्चित नसून केवळ संभाव्य कालावधी आहे.

चित्रपटात कोणते कलाकार आहेत?

ललित प्रभाकर यांच्यासोबत राजकुमार राव, वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिंकदर खेर, आशिष विद्यार्थी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वामिका गब्बी यांनी ज्योती निकम यांची, तर जयदीप अहलावत यांनी पाकिस्तानी सरकारी वकिल चौधरी झुल्फिकार अली यांची भूमिका साकारली आहे.अभिनेता ललित प्रभाकरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे.

चित्रपटाची कथा 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित सत्य घटनांवर आधारित आहे. यामध्ये 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यापासून अजमल कसाबच्या खटल्यापर्यंतच्या महत्त्वाच्या कायदेशीर लढायांचा समावेश आहे

त्यामुळे चित्रपटगृहात ‘प्रहार’ पाहू न शकलेल्या प्रेक्षकांना आता OTT प्रदर्शनाची प्रतिक्षा आहे. मात्र नेटफ्लिक्सवरील रिलीजची तारीख अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नाहीp

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट; जीवन...

पाऊस पडूनही खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा घटला; पाच दिवसांत ०.६१ टीएमसी पाणी कमी!

चार धरणांत अवघा ८०.५२ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४.९३ टीएमसी...

पुण्याला वाढीव पाणीकोटा मंजूर करा; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाढती लोकसंख्या, नव्याने समाविष्ट गावे आणि औद्योगिक विस्ताराचा मुद्दा;...