डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

Date:

जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट; जीवन प्रमाणपत्राचे प्रात्यक्षिक

पुणे, दि. २ : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या ‘जीवन प्रमाण’ अॅप व पोर्टलच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष न जाता मोबाईलद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येते.

यासाठी भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागामार्फत १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील २ हजार शहरे व जिल्ह्यांमध्ये पाचवी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी आज रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे येथे भेट देऊन अभियानाचा आढावा घेतला.

यावेळी लेखा व कोषागारे, पुणे विभागाच्या सहसंचालक भारती देशमुख, वरिष्ठ कोषागार अधिकारी गायत्री तुकाराम जाधव, निवृत्तीवेतन विभागातील अधिकारी, निवृत्तीवेतनधारक संघटनेचे पदाधिकारी आणि निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.

भेटी दरम्यान श्री. गुप्ता यांनी निवृत्तीवेतन शाखा व निवृत्तीवेतन शाखेतील लेखा लिपिक यांच्याशी संवाध साधून जीवन प्रमाणपत्र संकेतस्थळावर असणाऱ्या सुधारणांबाबत माहिती घेतली. तसेच उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाण पोर्टलवर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली.

यावेळी वरिष्ठ कोषागार अधिकारी गायत्री तुकाराम जाधव यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ पोर्टलचा वापर करून डिजिटल स्वरूपात हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ आता OTT वर पाहता येणार; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

चित्रपटगृहात जाऊन प्रहार पाहायचा राहून गेला असेल, आपल्या लाडक्या...

पाऊस पडूनही खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा घटला; पाच दिवसांत ०.६१ टीएमसी पाणी कमी!

चार धरणांत अवघा ८०.५२ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४.९३ टीएमसी...

पुण्याला वाढीव पाणीकोटा मंजूर करा; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाढती लोकसंख्या, नव्याने समाविष्ट गावे आणि औद्योगिक विस्ताराचा मुद्दा;...