पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता सारसबाग ते पर्वती रोप-वे ने जाता येणार; सल्लागार नियुक्तीला स्थायी समितीची मान्यता!

Date:

पुणे, ३० ऑक्टोबर : सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी आज दिली.

प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यासाठी २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोप-वे प्रकल्प इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तंत्रज्ञानावर आधारित असल्याने महापालिकेकडे आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनापासून निविदा प्रक्रियेपर्यंतची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येणार आहे.

सल्लागार नियुक्तीसाठी महापालिकेने ऑगस्ट २०२६ मध्ये निविदा मागविल्या होत्या. सल्लागाराला प्रकल्पाच्या रकमेच्या १.२७ टक्के किंवा किमान दोन कोटी ५४ लाख रुपये यापैकी अधिक असलेली रक्कम शुल्क म्हणून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यावर जीएसटी आणि अन्य लागू कर अतिरिक्त असतील.

सल्लागाराकडून प्रकल्पाच्या जागेची पाहणी, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), अंदाजपत्रक आणि निविदेच्या अटी-शर्ती तयार करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय परवानग्यांची प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) किंवा डीबीएफओटी पद्धतीने राबविणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल का, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. निविदांमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यमापन करून कार्यादेश देण्यापर्यंतची प्रक्रिया सल्लागारामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रस्तावित आराखड्यानुसार पेशवे पार्क ते पर्वतीदरम्यान सुमारे ७५० मीटर लांबीचा रोप-वे उभारण्याचे नियोजन आहे. या मार्गावर १२ ते ४० मीटर उंचीचे पाच टॉवर आणि प्रत्येकी आठ प्रवाशांची क्षमता असलेल्या २२ केबिन प्रस्तावित आहेत. या रोप-वेमुळे अवघ्या अडीच मिनिटांत पर्वती गाठता येणार असून, एका दिशेने ताशी दीड हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


असा असेल प्रस्तावित रोप-वे

  • मार्ग : पेशवे पार्क ते पर्वती
  • लांबी : ७५० मीटर
  • टॉवर : ५
  • टॉवरची उंची : १२ ते ४० मीटर
  • केबिन : २२
  • प्रत्येक केबिनची क्षमता : ८ प्रवासी
  • प्रवासाचा कालावधी : अडीच मिनिटे
  • वाहतूक क्षमता : एका दिशेने ताशी १,५०० प्रवासी

सल्लागाराकडे या जबाबदाऱ्या

  • प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे.
  • सविस्तर प्रकल्प अहवाल आणि अंदाजपत्रक तयार करणे.
  • पीपीपी आणि डीबीएफओटी पद्धतींचा अभ्यास करणे.
  • आवश्यक शासकीय परवानग्यांसाठी मार्गदर्शन करणे.
  • निविदांचे मूल्यमापन करून कार्यादेशापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करणे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात न्यायालयाच्या कक्षातच राडा! पोलिसांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालयीन कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड;...

उजनी धरणावर २ हजार मेगावॅटचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प

पुणे,दि.३१: उजनी धरण परिसरात प्रस्तावित फ्लोटिंग सोलार, बॅटरी स्टोरेज...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार‘पुणे राष्ट्रीय एकता दौड’चा ‘फ्लॅगऑफ’

१५ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन नशामुक्त...