बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र

Date:

‘विष्णूबाळा’ चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे

सध्या रुपेरी पडद्यावर कलाकारांची पुढची पिढी मुख्य भूमिकांमध्ये बघायला मिळतेय. राजकारणात किंवा मनोरंजन क्षेत्रात बाप-बेटे एकत्र असणे आता नवं  नाही. चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत एका विशेष जोडीचा समावेश होणार आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून ही बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ सयाजी शिंदे अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.

‘विष्णूबाळा’ या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत सिद्धार्थ दिसणार आहे. ‘महाविद्यालयीन काळापासून मला या क्षेत्राची ओढ वाटू लागली. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अभिनयाचे  रितसर प्रशिक्षण ही घेतले. सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून हे मी ठरवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या पदार्पणाचा आणि वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय, हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं हे दोघे सांगतात. या बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहणे निश्चितच पर्वणी असणार आहे.

‘विष्णूबाळा’ चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेम्यटिक सफारी फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली होत असून, लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. दिग्दर्शनाची धुरा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून यश मिळवलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे सांभाळत आहेत. निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन यांची असून सहनिर्माते सचिन क्षीरसागर आहेत. कार्यकारी निर्माते आदित्य गायकवाड आहेत. 

सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाच्या समस्यांबाबत विरोधी पक्षनेते आक्रमक

विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांची घोले रोडवरील वसतिगृहाला भेट;...

इंडसइंड जनरल इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शरद माथूर यांची नियुक्ती

वैधानिक मंजुरीनंतर नियुक्तीची घोषणा; विमा आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील...

नागपुरात पहिल्या लक्झरी गोल्फ कोर्स टाउनशिपची घोषणा; २,१०० कोटींच्या संभाव्य महसुलाचा अंदाज

क्रिसाला डेव्हलपर्स आणि ‘एलेव्हा बाय हिरानंदानी कम्युनिटीज’ यांचा संयुक्त...