राज्यातील ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांना

Date:

विद्युत सुरक्षेचे धडे अन् हरित ऊर्जेचा जागर

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर २०२६: एरवी राज्याला प्रकाशमय ठेवण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यांनी यंदा संवेदनशीलतेने सामाजिक बांधिलकी जपत भावी पिढीच्या विद्युत सुरक्षेचा नवा अध्याय लिहिला. विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचतीबाबत जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने गेल्या पंधरवड्यात या अभियंत्यांनी राज्यातील तब्बल २ हजार ९१४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सुमारे ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांचे सादरीकरण व थेट संवादाद्वारे प्रबोधन केले. या विशेष उपक्रमादरम्यान शैक्षणिक संकुलांमध्ये विद्युत सुरक्षेचे पोस्टर्स, फ्लेक्स आणि माहितीपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्युत यंत्रणेविषयी योग्य माहिती नसल्याने राज्यात लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे विद्युत अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून महावितरणकडून यंदा अभियंता दिन व गणेशोत्सवाचे औचित्य साधून विद्युत सुरक्षा व हरित ऊर्जा प्रबोधन अभियान राबविण्यात आले. यामध्ये विद्युत सुरक्षेचे चित्रमय सादरीकरण, माहितीपत्रके आणि विविध प्रात्यक्षिके यासह विजेची निर्मिती व तिचा प्रवास कसा होतो यासह ऊर्जा बचत आणि ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयासाठी भावी पिढीला हरित ऊर्जेचे महत्त्व समजून सांगण्यात आले.

मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार आणि कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांच्या पुढाकाराने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. दि. १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील २ हजार ९१४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे ६ लाख १९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत महावितरणच्या अभियंत्यांनी अत्यंत सोप्या भाषेत, रंजक प्रसंगांतून आणि चित्रांच्या माध्यमातून ‘विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा बचत’ या विषयांवर प्रबोधन केले. या सादरीकरणानंतर बहुतांश शाळांमध्ये विजेचा प्रवास, विद्युत सुरक्षा आणि हरित ऊर्जेबाबत प्रश्नोत्तरांचे तास रंगले. तसेच अनेक शाळांमध्ये विद्युत सुरक्षेच्या विषयांवर चित्रांमध्ये रंग भरण्याची स्पर्धा घेण्यात आली.

या अभियानातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, पुणे येथील ‘द पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाईंड’ या शाळेमध्ये अभियंत्यांनी विद्युत अपघाताबाबत अंध विद्यार्थ्यांना आवाज, स्पर्श आणि गंधाद्वारे संभाव्य विद्युत अपघाताचा धोका कसा ओळखावा याचे अत्यंत संवेदनशीलतेने प्रात्यक्षिक दिले. संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनीही जळगाव येथे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

राज्यभरात राबवण्यात आलेल्या या अभियानात कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ९४६ शाळांमध्ये २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांना, नागपूर प्रादेशिक विभागात ८९९ शाळांमध्ये १ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांना, पुणे प्रादेशिक विभागात ८२७ शाळांमध्ये १ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांना आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात २४२ शाळांमध्ये ६५ हजार विद्यार्थ्यांना थेट संवादाच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेचे व हरित ऊर्जेची माहिती दिली.

विद्युत सुरक्षा व बचत आणि हरित ऊर्जेची पेरणी करणाऱ्या महावितरणच्या या उपक्रमाचे राज्यभरातील शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून जोरदार स्वागत करण्यात आले. महावितरणमधील अभियंत्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेमुळे राज्यात शून्य विद्युत अपघाताच्या दिशेने व विद्युत सुरक्षेच्या जागराचे एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एसटी प्रवाशांना गुंगीच्या गोळ्या देऊन सोन्याचे दागिने लुटणारा सराईत चोरटा गजाआड;

स्वारगेट पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई६३ वर्षीय आरोपीला अटक;...

मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी!

१ नोव्हेंबरपासून नवीन वाहतूक नियम लागू; कारसाठी ताशी १००,...

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक मतदार यादीचे सर्वंकष ऑडिट करा: धनंजय शिंदे

मतदाराची पात्रता तपासा; दुबार ठराव, सभासदत्वातील विसंगती आणि पूर्वीच्या...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; आयपीएस शैलेश बलकवडे करणार नेतृत्व!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांची कारवाई; मनोज...