जागतिक पॉवरलिफ्टर प्रतिभा लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’ प्रदान

Date:

​पुणे: अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून आंबेडकरनगर, कोंढवा बुद्रुक येथे आयोजित विशेष समारंभात आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर प्रतिभा अरुण लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘संजीवनी एज्युकेशनल, कल्चरल अँड स्पोर्ट्स रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने प्रदान करण्यात आला.
​समारंभादरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा लोणे हिला सन्मानचिन्ह, मानपत्र, २०,००० रुपयांचा धनादेश, पॅट्रिक ऑलिवेल लिखित ‘सम्राट अशोक’ या पुस्तकाची प्रत, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, सचिव तथा पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका अर्चना जगताप, खजिनदार अश्विनी सरवदे, सहसचिव प्रा.श्रीकृष्ण थेटे, दीपक सोनवणे, अक्षय भांडे, वैभव रणदिवे उपस्थित होते.
​खेळाडूंनी सम्राट अशोकांचा आदर्श घ्यावा : अमित जगताप
उपस्थितांना संबोधित करताना फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप म्हणाले, “सम्राट अशोक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी सारे विश्व पादाक्रांत करावे. प्रतिभा लोणेसारख्या अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे येऊन जागतिक पॉवरलिफ्टिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या खेळाडूच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन तसेच संपूर्ण समाज भक्कमपणे उभा आहे.”

​तुर्कीतील जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रतिभा लोणेने नुकत्याच उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पार पडलेल्या ओपन सिनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्ण व एका रौप्य पदकासह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची नोव्हेंबर २०२६ मध्ये इस्तंबूल (तुर्की) येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड ओपन इक्विप्ड चॅम्पियनशिप २०२६’ साठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या जागतिक स्तरावरील यशाचा गौरव म्हणूनच तिला हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ॲड. प्रितेश ओव्हाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीकृष्ण थेटे यांनी केले. या सोहळ्यास क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या १९१ पोलीस वीरांना पुण्यात मानवंदना; पोलीस स्मृतिदिनी शोक कवायत

पाषाण येथील पोलीस हुतात्मा स्मारकावर पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर...

विजयादशमी निमित्त पराक्रमी सेनाधिकारी सन्मान सोहळा

सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त...

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

पुण्यात ‘आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ चे उद्घाटन               पुणे, दि....