विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ : मकरंद अनासपुरे

Date:

भरत-रोटरी करंडक स्पर्धेचे पारितोषिक आणि संस्था पुरस्कारांचे वितरण

पुणे : रंगमंचावरील धुपाचा वास, तिसरी घंटा ऐकली की कलाकरांची समाधी लागते. धडपडीतून कलावंत बनण्याचा प्रयत्न हा अवर्णनीय असतो. आपल्याला जे म्हणायचे असते, समाजाविषयी जे मांडायचे असते ते तरुण मंडळी कलेच्या माध्यमातून रंगमंचावर मांडत असतात. जेथे व्यक्त होण्याचा प्रयत्न केला जात असतो ती आपली खरी जागा असते, असे प्रतिपादन प्रख्यात सिने-नाट्य अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. आयुष्यात विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला खरा अर्थ आहे. एकदा ते विद्यार्थीपण संपले की अस्तित्व उरत नाही. असे होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

१३२ वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर या एकमेव मराठी नाट्य संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या संस्था पुरस्कारांचे वितरण आणि भरत-रोटरी एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. १९) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मकरंद अनासपुरे बोलत होते. पु. ल. देशपांडे अकॅडमीच्या संचालक मीनल जोगळेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल नितीन ढमाले, भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, कार्याध्यक्ष अभय जबडे, राजेंद्र उत्तुरकर तसेच परिक्षक संजय डोळे, नरेंद्र आमले, रश्मिता शहापूरकर मंचावर होते. भरत नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या प्रदीर्घ वाटचालीचा आणि रोटरी क्लबचा गौरव करून मकरंद अनासपुरे म्हणाले, सामाजिक कार्य करणारी मंडळी निरपेक्ष भावनेने कार्य करीत असतात. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, आभाळाचे झुंबर पडत का नाही त्यामागचे कारण म्हणजे नि:स्वार्थ भावनेने कार्य करीत असलेली मंडळी. त्यामुळे आपला समाज टिकून आहे. भरत नाट्य संशोधन मंदिरात प्रदीर्घ कार्य करणारे विठ्ठल हुलावळे यांच्या कार्याचा अनासपुरे यांनी विशेष गौरव केला.

मीनल जोगळेकर म्हणाल्या, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जे कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून निधी संकलनासाठी सहकार्य करतील त्यांना राज्य शासनाने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पु. ल. देशपांडे अकादमी सहकार्य करणार आहे. जोगळेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भरत नाट्य संशोधन मंदिराच्या वतीने तीन नाटकांचा महोत्सव आयोजित करण्याची ग्वाही कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी या वेळी दिली.

नितीन ढमाले यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांची माहिती विशद केली.

भरत नाट्य संशोधन मंदिरातील पडद्यामागील कलाकारांचे पाल्य चिन्मय अमित धुमाळ, श्रेयांश शंतनू कोतवाल, श्रावणी गजानन माळवदकर यांना शिष्यवृत्ती तर सेवाभावी संस्था सहजीवन वृद्धाश्रम आणि डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स यांना आर्थिक मदत देण्यात आली. अनुक्रमे डॉ. दिलीप देवधर आणि धनंजय बर्वे यांनी ही मदत स्वीकारली.

चारुलता पाटणकर, डॉ. प्रचिती सुरू-कुलकर्णी, अभिजित पोतनीस यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

सांघिक प्रथम : भिरभिर (प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय), द्वितीय : हँडल विथ केअर (पी. व्ही. पी. आय. टी. पद्म कला मंडळ), तृतीय : लाजाळू (भारती विद्यापीठ फाईन आर्ट्‌स महाविद्यालय), उत्तेजनार्थ : स्किम (मराठवाडा शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय), काही प्रॉब्लेम ये का? (रसाभिमान, अहिल्यानगर)

लेखन प्रथम : प्रतिक्षा शेलार (क्षतिपूर्ती), द्वितीय : मुकुल ढेकळे (स्किम), उत्तेजनार्थ : दिपाली धुमाळ (आठवडे बाजार),

दिग्दर्शन प्रथम : युसुफअली अब्दुल रझाक शेख (भिरभिर). द्वितीय : स्वानंदी भारताल, पवन पोटे (लाजाळू), उत्तेजनार्थ : आश्विन ठाकूर (हँडल विथ केअर).

अभिनय : पुरुष : प्रथम : दर्शन यादव, द्वितीय : पवन पोटे

अभिनय : स्त्री : प्रथम : सुप्रिया यादव, द्वितीय : स्वानंदी भारताल

लक्षवेधी अभिनय : पुरुष : युसुफअली अब्दुल रझाक शेख

लक्षवेधी अभियन : स्त्री : तनिष्का देशमुख

प्रकाशयोजना प्रथम : निखिल मारणे, द्वितीय : ओंकार लाटे

ध्वनीसंयोजन प्रथम : संस्कार फडके, द्वितीय : वेदांत चौरे

नेपथ्य प्रथम : विक्रांत मुंढे, हरिष चेन्निलीवार, द्वितीय : ऋतुजा बोठे

संस्था पुरस्कारांचे मानकरी :

कै. अप्पासाहेब ताम्हणकर स्मरणार्थ उत्कृष्ट नाट्य कलावंत – अजिंक्य कुलकर्णी, कै. बबनराव गोखले स्मरणार्थ उत्कृष्ट संगीत वादक – स्वप्निल कुंभार, कै. उदयसिंह पाटील स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट बालकलाकार – गार्गी वैद्य, कै. गोपाळराव लिमये स्मरणार्थ संस्था कलाकार (नियोजन) – प्रदीप रत्नपारखे, गुणवंत संस्था कलाकार – विश्वास पांगारकर, कै. अवधूत घाटे स्मरणार्थ संस्था कलाकार – कौशिक कुलकर्णी, कै. गो. रा. जोशी स्मरणार्थ सौ. तेजा काटदरे पुरस्कृत नाट्यसमीक्षक/अभ्यासक – नीला शर्मा, श्रीकांत चौगुले पुरस्कृत नाट्यविषयक कारकीर्द – राजीव परांजपे, अभय जबडे पुरस्कृत रंगकर्मी पुरस्कार – विठ्ठल हुलावळे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे विमानतळावर 44 लाखांचा गांजा जप्त

पुणे-बँकॉकहून पुण्यात आलेल्या भारतीय प्रवाशाकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क...

सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवी

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; देवीला १६ किलो सोन्याची...

‘आपण लता युगात जन्मलो, हे आपले भाग्य!’ — आबा बागुल

३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘लता युग’ची सुरेल मैफल;...

पेट्रोलची जुनी गाडी इलेक्ट्रिक करून देण्याचे दावे किती खरे? लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी सावधान!

पेट्रोल गाडीचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर कायदेशीर; मात्र प्रमाणित किट, अधिकृत...