सेवा संकल्प अभियानात महावितरण गणेशखिंड मंडलाचा ग्राहकाभिमुख उपक्रम६४१ कामांचा निपटारा; ३०० ग्राहकांना मोबाईल ॲपचे मार्गदर्शन

Date:

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२६ : ग्राहकांना तत्पर, सुलभ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महावितरणच्या गणेशखिंड मंडळात ‘सेवा सेतू–सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विशेष ग्राहकाभिमुख मोहीम राबविण्यात आली. अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड, शिवाजीनगर, पिंपरी आणि भोसरी या चार विभागांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पोहोचून ग्राहकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा केला.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या परिसरातच महावितरणच्या सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. ग्राहकांना छोट्या कामांसाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासू नये, या उद्देशाने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये सेवा स्टॉल उभारण्यासोबतच गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही विशेष मोहीम राबविण्यात आली. रविवार, दि. ११ ऑक्टोबर आणि शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशीही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सेवा दिली.

या मोहिमेत ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली, मंगलम लाईफ सोसायटी, मोशी, गोदरेज स्कायलाइन, पुनावळे, जी.के. आर्यन, रावेत, ५७ मिडटाऊन, शाश्वत ४५, वृंदावन संकुल, सिल्व्हेनिया, जिजाई नगरी, काकडे सिटी, दोडके प्लाझो, हिमगौरी, कृष्णकुंज, अरुणाली, महेश पॅराडाईज, गंगा लिजेंड यांसह विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

६४१ ग्राहकांच्या कामांचा निपटारा

या मोहिमेदरम्यान २५१ ग्राहकांच्या नावांमध्ये बदल करून नोंदी अद्ययावत करण्यात आल्या. १८९ ग्राहकांच्या वीजबिलावरील पत्त्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर १६० ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी महावितरणच्या प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आले. तसेच ४१ ग्राहकांची चुकीची वीजबिले दुरुस्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ६४१ ग्राहकांच्या कामांवर कार्यवाही करण्यात आली. याशिवाय, ३०० ग्राहकांना महावितरणचे मोबाईल ॲप डाउनलोड करणे आणि त्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ग्राहकांच्या दारी महावितरणची सेवा

या उपक्रमामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत झाली. सोसायटीच्या परिसरातच सेवा उपलब्ध झाल्याने प्रलंबित कामे पूर्ण करणे अधिक सोयीचे झाले. तसेच मोबाईल ॲपच्या वापराबाबत मार्गदर्शन मिळाल्याने ग्राहकांना डिजिटल माध्यमातून महावितरणच्या विविध सेवा घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. सुट्टीच्या दिवशीही सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्राहकांना सेवा देण्याच्या महावितरणच्या पुढाकाराबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

सेवा संकल्प अभियान द्ष्टीक्षेप

  • ग्राहकांच्या नावात बदल : २५१
  • वीजबिलावरील पत्त्यात दुरुस्ती : १८९
  • मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत : १६०
  • चुकीची वीजबिले दुरुस्त : ४१
  • मोबाईल ॲप डाउनलोड व मार्गदर्शन : ३००
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...