श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात ३५० महिलांची तपासणी

Date:

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; श्री महालक्ष्मी मंदिर व हरजीवन हॉस्पिटल यांच्या तर्फे आयोजन
पुणे : रक्तदाब, श्वसन दर, शरीराचे तापमान, नाडी, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करा यांसारख्या तपासण्या नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात करण्यात आलया तब्बल ३५० महिलांच्या विविध तपासणी करण्यात आल्या. सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग व हरजीवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे शिबीर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांसह मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच आरोग्याचा जागर देखील व्हावा, याकरिता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबातील महिला आरोग्य दृष्टया सक्षम आणि साक्षर असेल, तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहू शकते. आजच्या धकाधकीच्या काळात महिलांनी  स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिबीरात संपूर्ण सीबीसी, थायरॉईड कार्यक्षमता, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी१२ या रक्ततपासण्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.  याशिवाय महिलांसाठी मॅमोग्राफी, हाडांच्या घनतेची तपासणी देखील करण्यात आली. तसेच मंदिरातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५० हून अधिक  जणांनी रक्तदान करीत सहभाग घेतला. आरोग्य शिबीराच्या नोंदणी व अधिक माहितीसाठी ७५१७५६९९२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! अभिनेता सुरक्षित, हल्लेखोरांचा शोध सुरू

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून गोळीबार झाल्याचे वृत्त; चालकासह दोघे जखमी...

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे सावट! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची...

पुण्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा! पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; तापमान ३४ अंशांवर

पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन दिवसही तापमान ३३ ते...

‘निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार आम्हीच’:मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; निवडणुकांसाठी प्रचाराला वेग

सोलापूर-राज्यातील विधानपरिषदेच्या 5 मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार...