श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

Date:

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नवरात्र उत्सव २०२६ निमित्त आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात आराध्य लांडे, तर आठवी ते दहावी गटात सई लांडगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष विभागात सार्थक सिंग याने प्रथम, तर अंश परचे याने द्वितीय क्रमांक मिळवला.  विजेत्यांना एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली, तर दोन विद्यार्थ्यांचा विशेष पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, स्वप्ना गोरे, मंदिराचे विश्वस्त भरत अग्रवाल, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी आणि प्रवीण चोरबेले उपस्थित होते. मंदिराचे संस्थापक, प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल व प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. 

‘प्राणी बोलू शकले तर’, ‘भिंती नसलेले ग्रंथालय’ आणि ‘जगाशी कनेक्टेड, आयुष्यापासून डिस्कनेक्टेड’ हे तीन विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. अनंत डेरे आणि निताली हरगुडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. इयत्ता पाचवी ते सातवी गटात अभिनव विद्यालयाच्या आराध्य लांडे याने प्रथम क्रमांक मिळवला. जी. आर. पालकर प्राथमिक शाळेच्या कार्तिक पाटील याने द्वितीय, तर विस्डम वर्ल्ड स्कूल, वाकडच्या रिद्धी साहू हिने तृतीय क्रमांक पटकावला.

इयत्ता आठवी ते दहावी गटात ज्ञानेश विद्यालयाच्या सई लांडगे हिने प्रथम क्रमांक मिळवला. सेंट मिराज विद्यालयाच्या सानुजा पाटील हिने द्वितीय, तर ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या समृद्धी बारटक्के हिने तृतीय क्रमांक पटकावला. विशेष विभागात सार्थक सिंग याने प्रथम, तर अंश परचे याने द्वितीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी; युनिव्हर्सल विस्डम स्कूल, बालेवाडी; विस्डम वर्ल्ड स्कूल, वाकड व हडपसर; महेश विद्यालय, कर्वे रोड आणि मॉडेल स्कूल, शिवाजीनगर या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...

धरणातून १९.०५ टीएमसी पाणी सोडले; त्यातील ३ टीएमसी वाचवता, साठवता आले असते का? पाणी नियोजनावर सवाल!

खडकवासला धरणसाखळीत आता २५.४९ टीएमसी पाणीसाठा; गेल्या वर्षी याच...