पोलीस क्षेत्रात महिला पोलिसांचे कर्तृत्व पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे 

Date:

पोलीस सह आयुक्त संजय दराडे ; श्री महालक्ष्मी मंदिरात कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान
पुणे : पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र पुणेकरांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. पोलीस दलातील धावपळीच्या आणि आव्हानात्मक नोकरीसोबतच त्या घराची जबाबदारीही समर्थपणे सांभाळतात. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या पोलीस क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. असे प्रतिपादन पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी केले.

सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संजय दराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती भरत अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, युवराज लाहोटी यांसह विशाल सोनी आदी उपस्थित होते.

संजय दराडे म्हणाले, पोलीस दलात गेल्या २० वर्षांपासून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आहे. पोलीस दलातील कर्तव्याचे स्वरूप आव्हानात्मक असून, २४ तास दक्ष राहावे लागते. कधीही फोन येऊ शकतो आणि तातडीने कर्तव्यावर हजर व्हावे लागते. अशा परिस्थितीतही महिला पोलीस अधिकारी कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडून विभागाचे कर्तव्य बजावतात. डॉक्टरांची ओपीडी रात्री थांबते; मात्र महिला पोलिसांचे काम २४ तास सुरू असते. या आव्हानांना सामोरे जात त्या धैर्याने आणि खंबीरपणे काम करतात.

भरत अग्रवाल म्हणाले, नवरात्रोत्सवात देवीचा जागर केला जातो. यानिमित्ताने समाजाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याची संधी मिळाली. महिलांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाल्यास त्या पुरुषांनाही मागे टाकू शकतात. अनेक क्षेत्रांत महिलांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.

या वेळी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे, नूतन पवार, नम्रता देसाई, स्वप्ना बोकील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, अश्विनी सातपुते, माया देवरे, रुणाल मुल्ला, सुनीता नवले, प्रियंका गोरे, सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख, संजना काकडे तसेच वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचे निर्देश

पुणे, दि.१६: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर)...

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण...