महिलांच्या योगदानाची जाणीव हाच त्यांच्या सन्मानाचा पाया – राजेंद्र पवार

Date:

महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव

पुणे, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : महिलांना विविध आघाड्यांवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यांच्या या प्रयत्नांची आणि योगदानाची जाणीव ठेवणाऱ्या पुरुषांच्या मनात महिलांविषयीचा आदर आपोआप वाढतो, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गणेशखिंड येथील प्रकाशभवन सभागृहात बुधवारी (दि. १४) आयोजित करण्यात आलेल्या ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक (विवले) कीर्ती भोसले, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सत्यजित राजेशिर्के व दीप्ती अंबेकर, कार्यकारी अभियंता अपर्णा मुनशेट्टीवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटणी यांच्यासह महावितरणमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर म्हणाले की, कालबाह्य झालेल्या कर्मचारी कल्याण योजनांना काळानुरूप स्वरूप देतानाच संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत भरघोस वाढ केली आहे. महिला एकदा एखादे काम पूर्ण करण्याचा निर्धार करतात, तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत. त्यांच्या या जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा गौरव होणे आवश्यक आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता अपर्णा मुनशेट्टीवार, जलतरणपटू नेहा बनसोड, हिना कुरणे, अनिता वाकसे, भाग्यश्री जोशी, नितल हासे, शितल बोथे आणि सुरभी टाकसाळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि वाटचालीतील विविध पैलू उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती जोशी व स्वागती सोळंकुरे यांनी केले, तर आभार अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात विजांच्या कडकडाटाचा इशारा

१६ ऑक्टोबरला हवामान बदलणार; देशातील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज,...

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२६: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित...

आरोग्य केंद्रात औषधांचा साठा पत्र्याच्या खोलीत ! महापौरांच्या अचानक पाहणीत अमराळे दवाखान्यातील गैरव्यवस्थापन उघड

शिवाजीनगरच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’ला महापौर मंजुषा नागपुरेंची अचानक भेट;...

धर्म आणि विज्ञानाचा समन्वय साधणारे संशोधक राष्ट्रपती म्हणजे डॉ. कलाम

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; डॉ. ए....