मुलांना ‘विंग्ज ऑफ फायर’ वाचायला द्या, मोठी स्वप्ने पाहण्यास सांगा !

Date:

  • ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
  • डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘पीएमआरडीए’त अभिवादन

पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’, महान शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज (दि. १५) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी, “मुलांच्या हातात ‘विंग्ज ऑफ फायर’ हे पुस्तक द्या आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहायला सांगा. हीच डॉ. कलाम यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे प्रतिपादन केले.

अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, राष्ट्रासाठी किती समर्पित भावनेने काम करता येते, हे डॉ. कलाम यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. रामेश्वरम येथील एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास इस्रो आणि डीआरडीओमधील कार्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला. हा प्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. वृत्तपत्रे विकण्यापासून ते भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास जिद्द आणि परिश्रमांच्या जोरावर माणूस कोणत्याही उंचीवर पोहोचू शकतो, हे सिद्ध करतो.

या कार्यक्रमास ‘पीएमआरडीए’च्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, अधीक्षक अभियंता अनिल सगर, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षिका आशा जाधव, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, उपअभियंता डी. एम. चौरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह ‘पीएमआरडीए’चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘त्या’ उपक्रमाची के. मंजुलक्ष्मी यांनी जागवली आठवण!

याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक व आयुक्त म्हणून कार्यरत असताना राबविण्यात आलेल्या एका विशेष उपक्रमाची आठवण उपस्थितांना सांगितली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या २५ गुणवंत विद्यार्थ्यांनी अभ्यास सहलीसाठी थेट विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे भरारी घेतली होती. कोल्हापूर महानगरपालिकेचा हा उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देणारा आणि त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला. के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत होता. सातत्याने असा उपक्रम राबविणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली होती. या उपक्रमामुळे गोरगरीब, परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊनच हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२६: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित...

आरोग्य केंद्रात औषधांचा साठा पत्र्याच्या खोलीत ! महापौरांच्या अचानक पाहणीत अमराळे दवाखान्यातील गैरव्यवस्थापन उघड

शिवाजीनगरच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’ला महापौर मंजुषा नागपुरेंची अचानक भेट;...

धर्म आणि विज्ञानाचा समन्वय साधणारे संशोधक राष्ट्रपती म्हणजे डॉ. कलाम

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; डॉ. ए....

महापौर निवासस्थानी नवरात्री निमीत्त रंगला भोंडला आणि कन्यापूजन

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संवेदनशीलतेचा उपक्रम;...