‘काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात!’:शर्मिला ठाकरेंचा आयोगावर घणाघात; आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन

Date:

पुणे–मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून देशभरात, विशेषतः दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीसह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून तीव्र आंदोलने सुरू आहेत. जोपर्यंत निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे. या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून मुंबईत ठाकरे गट आणि मनसेने आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच जेजुरीमध्ये मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनीही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महत्त्वपूर्ण वक्तव्य करत या आंदोलनातील आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात. आता हे बंद करायचं आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. शर्मिला ठाकरे या जेजूरी येथे एका कार्यकर्त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, खरं काम करणाऱ्या माणसांसाठी आज तुम्ही जेजूरीच्या खंडेरायला नवस बोला. यंदा दुष्काळाचं मोठं संकट आहे. मी रस्त्यावर बघितलं सगळी पिकं जळून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील भाव मिळत नसल्याची खंत ठाकरे यआणि बोलून दाखवली. तसेक त्यांनी हे संकट दूर होण्यासाठी आई आंबेला प्रार्थना करते, असेही म्हटले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्कवर सीजेपी, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. या बहुचर्चित आंदोलनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने निवडणूक आयोगाविरोधातील वातावरण अधिकच तापले असून, या तीव्र निदर्शनांनंतर पोलिसांनी कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दुष्काळी उपाययोजनांचे जिल्हानिहाय प्रस्ताव १५ दिवसांत मागविण्याचे निर्देश दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ...

प्रत्येक उत्सवाला लोकरंजना बरोबरच सामाजिक उपक्रमांची जोड – संदीप खर्डेकर.

पुणे-क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे "कोथरूड...