रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित

Date:

जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची कारवाई; दोन विक्रेत्यांना सक्त ताकीद

पुणे, दि. १४ : रब्बी हंगाम २०२६ मध्ये निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी पुणे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांच्या तपासण्या केल्या. या तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळलेल्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, चार विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच दोन विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीदरम्यान विक्री परवान्यातील साठा नोंदवहीनुसार शिल्लक असलेला खतसाठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध खतसाठा यामध्ये तफावत असणे, विक्री परवान्यात समाविष्ट नसलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करणे, जादा दराने खत विक्री करणे, नोंदणी प्रमाणपत्राचे विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, परवाना ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी न लावणे, खत विक्रीचा मासिक प्रगती अहवाल परवाना अधिकाऱ्यांना सादर न करणे आणि मुदतबाह्य निविष्ठा विक्रीसाठी ठेवणे, अशा त्रुटी आढळून आल्या.

या अनियमिततांमुळे संबंधित खत विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य दर्जाची खते, रास्त दरात आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागामार्फत तपासणी व गुणवत्ता नियंत्रणाची मोहीम राबविण्यात येत आहे. खत विक्रेत्यांनी विक्री परवान्यातील अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे. साठा नोंदवही अद्ययावत ठेवावी, दरपत्रक व उपलब्ध साठ्याची माहिती दर्शनी भागात लावावी आणि शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दुष्काळी उपाययोजनांचे जिल्हानिहाय प्रस्ताव १५ दिवसांत मागविण्याचे निर्देश दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ...

प्रत्येक उत्सवाला लोकरंजना बरोबरच सामाजिक उपक्रमांची जोड – संदीप खर्डेकर.

पुणे-क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे "कोथरूड...