श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी
पुणे : आई तुझ्या ग चरणी… आई गोंधळाला ये… च्या तालावर पुणेकरांनी माता माता की जय… चा गजर केला. श्री महालक्ष्मी मंदिरासमोर भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टीत अष्टलक्ष्मी भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो देवीभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. यावेळी मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. अशाप्रकारे नवरात्रात पहिल्यांदाच मंगळवारच्या औचित्यपूर्ण महत्त्व लक्षात घेऊन अशी वैविध्यपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या,  श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात अष्टलक्ष्मी भव्य रथयात्रा सोहळा यापूर्वी झालेला नव्हता. त्यामुळे यंदा मंदिरातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला. मंदिरासमोर पुष्पवृष्टी करून या रथयात्रा सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विश्वकर्मा विद्यापीठातील पदाधिकारी, मंदिराचे कार्यकर्ते व राजेश अंबिके, शेखर निवंगुणे यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला. मंदिरा बाहेर दररोज सायंकाळी ७.३० वाजता गंगा आरती आयोजन करण्यात येत असून याला देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बळीराजाला दिवाळीपूर्वी ५ हजाराची भेट ; राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा; ४० नवीन...