पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान

Date:

पद्मश्री पोपटराव पवार ; श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे अन्नदाता शक्ती : महिला शेतकरी व कृषी उद्योजिकांचा सन्मान
पुणे : प्लास्टिक नावाचा मोठा राक्षस आपण आणला आहे. जमिनीखाली पाणी जायचे बंद केले आणि जमिनीवर पाणी आणून ठेवले, ही उद्याच्या भविष्यकाळात सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये ‘अन्नदाता शक्ती : महाराष्ट्राच्या विविध भागातील महिला शेतकरी व कृषी उद्योजिकांचा सन्मान’ करण्यात आला. यावेळी ट्रस्ट च्या विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, ऍड. प्रताप परदेशी यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.  

महाराष्ट्राच्या विविध भागातील कृषी उद्योजिका सुनिताराजे पवार, पूजा बोडके, प्रिया जाधव, वैशाली भरणे, शेतकरी पूनम गावडे, अश्विनी ताजणे, सुरेखा माने, सुरेखा बनकर, वैशाली पवार, उद्योजिका डॉ.कृष्णा सोनी, हर्षदा टेमगिरे, श्रावणी बोडके यांचा सन्मान करण्यात आला. महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन महिलांना गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते देवीची आरती देखील झाली.

पोपटराव पवार  म्हणाले, मातृत्व शक्ती आणि आपली भूमाता याकरिता आपण म्हणतो ‘इडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो’, कारण बळी हाच सर्वांचा पोशिंदा आहे. पोशिंदा हाच या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ असतो. आदिमानवापासून आपण स्थलांतरित शेती आपण करत होतो. कालांतराने माणसाने संरक्षित पाण्याचा शोध लावला आणि सुरुवातीला नदीपात्रात वाळू मध्ये शेती सुरु झाली. त्यानंतर पाणी शोधून शेतात काम सुरु झाले. ही प्रगती होत गेली असली तरी देखील आपल्यासमोर आज अनेक आव्हाने आहेत, असेही त्यांनी सांगितले.

भरत अग्रवाल म्हणाले, शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नाही. तर, ती आपली संस्कृती, परंपरा असून अर्थव्यवस्थेचा  भक्कम आधार आहे. शेतीव्यवस्थेत महिलांचे मोठे योगदान आहे. ऊन, पाऊस सगळ्या संकटांवर मात करीत शेतकरी कार्यरत राहतात. त्यामुळेच या शेतकरी महिला व कृषी उद्योजिकांचा गौरव करणे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत महालक्ष्मी मंदिरातर्फे आम्ही निवडक १० गावांमध्ये पाण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन;...

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला- अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे आदेश

महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६:...

पुणे–बंगळुरू महामार्ग दिवसभर ठप्प: राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

पुणे- महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकातील हत्तरकी...

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) व एमटीपी (MTP) आढावा बैठक; दलालांची...