बावधन RMC मुक्त ! किरण दगडे पाटलांच्या RMC विरोधातील लढ्याला मोठे यश; पाच प्लांट्सवर कारवाई !

Date:


पुणे-

बावधन बुद्रुकमधील RMC प्लांट्सविरोधात नगर सेवक किरण दगडे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला आज महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. नागरिकांचा RMC प्लांट्सला सातत्यपूर्ण विरोध, माझी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी आणि पुणे महानगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे तब्बल पाच RMC प्लांट्सवर कारवाई करण्यात आली आहे.हा विजय माझ्या एकट्याचा नाही तर आपल्या परिसराचे आरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरण जपण्यासाठी एकजुटीने उभ्या राहिलेल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. नागरिकांनी दाखवून दिले की, आपल्या हक्कासाठी एकत्र आलेला जनसमुदाय प्रशासनाला ठोस कारवाई करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो.आपली एकजूट, आपला आवाज आणि आपला संघर्ष हाच बदलाचा खरा आधार आहे! बावधनच्या हितासाठी हा लढा यापुढेही असाच ठामपणे सुरू राहील.असे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी म्हटले आहे .

पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभाग, बांधकाम अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाच्या संयुक्त पथकाने बावधन परिसरातील पाच आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांटवर कारवाई करत ते सील केले. महापालिकेच्या तीन विभागांनी एकत्रितपणे केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील आरएमसी प्लांटच्या कामकाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपआयुक्त संदीप कदम, बांधकाम अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.या मोहिमेत पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी समन्वय साधत बावधन येथील पाच आरएमसी प्लांटवर कारवाई केली. कारवाईदरम्यान संबंधित प्लांट सील करण्यात आले. शहरातील बांधकामविषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणे, तसेच महापालिकेच्या नियमांची अंमलबजावणी करणे, या दृष्टीने संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

बावधन परिसरात नागरीकरण आणि बांधकाम क्षेत्राचा विस्तार होत असताना आरएमसी प्लांटच्या कामकाजाबाबत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा प्लांटच्या कामकाजामुळे परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सदरचे क्षेत्र HCMRL प्रतिबंधित क्षेत्र आहे त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन;...

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला- अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे आदेश

महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६:...

पुणे–बंगळुरू महामार्ग दिवसभर ठप्प: राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

पुणे- महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकातील हत्तरकी...

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) व एमटीपी (MTP) आढावा बैठक; दलालांची...