गुहागर येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर करा-सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

Date:

एमटीडीसीसोबत संयुक्त भागीदारीत प्रकल्प उभारण्याच्या सूचना

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. या प्रकल्पासाठी चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करावा आणि संपूर्ण प्रस्ताव महिनाभरात सादर करावा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे पालशेतसह परिसरातील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रपट निर्मितीसाठी शासनामार्फत योजना तयार करण्याबाबत मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कोकणात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विविध सूचना मांडल्या.

गुहागर आणि दापोली तालुक्यांतील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी उपयुक्त आहेत. या परिसरात अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत उपलब्ध होण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी एकाच ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास चित्रपट निर्मितीला चालना मिळेल, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे डॉ. नातू यांनी सांगितले.

गुहागर तालुक्यातील पालशेत, वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली. या जागांवर सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून सुविधा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

मौजे पालशेत येथे पर्यटन विभागाची शासनाच्या मालकीची सुमारे १२५ एकर जागा उपलब्ध असून, या जागेवर पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित कराव्यात, अशी सूचना माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शासनाकडे केली होती. या ठिकाणी शासनामार्फत फिल्मसिटी उभारल्यास परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या अनुषंगाने आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली.

एमटीडीसीसोबत संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून फिल्मसिटी उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेचे विविध पर्याय तपासून महिनाभरात सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी बैठकीत दिले.

या बैठकीस माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे–बंगळुरू महामार्ग दिवसभर ठप्प: राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

पुणे- महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकातील हत्तरकी...

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) व एमटीपी (MTP) आढावा बैठक; दलालांची...

अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण

पुणे – अर्थपूर्ण शब्द आणि प्रसंगानुसार बांधलेली चाल, सुरेल...

दुष्काळग्रस्तांना पाणी, चारा आणि रोजगाराचा प्रत्यक्ष लाभ मिळावा : डॉ. नीलम गोऱ्हे

सर्वांना सुखी ठेवा, कुणालाही आत्महत्या करावीशी वाटू नये अशी...