उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’त ‘फॅसिलिटेशन सेंटर’; परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होणार!

Date:

  • औद्योगिक प्रस्तावांच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा निर्णय
  • औद्योगिक संघटनांसोबतच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील औद्योगिक विकासाला गती देण्यासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या वतीने विशेष ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.

डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (दि. १३) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, संबंधित विभागांचे प्रमुख व अधिकारी, तसेच चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव, पिरंगुट आणि इतर औद्योगिक क्षेत्रांतील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विकास परवानगी, फायर एनओसी, बीपीएमएस प्रणालीतील अडचणी, शुल्क आकारणी, आवश्यक कागदपत्रे, झोनिंग ओपिनियन आणि विविध प्रलंबित औद्योगिक प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक पारदर्शक करण्यासाठी १०० टक्के ऑनलाइन बीपीएमएस प्रणालीद्वारेच प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. बीपीएमएस प्रक्रियेदरम्यान उद्योजक आणि वास्तुविशारदांना येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि बीपीएमएस प्रतिनिधी यांच्या समन्वयातून ‘फॅसिलिटेशन सेंटर’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, शुल्काचा तपशील, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि इतर महत्त्वाची माहिती औद्योगिक संघटनांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महानगर आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

औद्योगिक क्षेत्रांतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याकडे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. प्राधान्याने सुधारणा करावयाच्या रस्त्यांची यादी औद्योगिक संघटनांकडून मागविण्यात आली आहे. तसेच, अवजड वाहनांसाठी ‘ट्रक टर्मिनस’ उभारणे आणि औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी या बैठकीत दिले.

‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील औद्योगिक विकासाला चालना देणे, उद्योजकांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे आणि परवानगी प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक करणे हा ‘पीएमआरडीए’चा उद्देश आहे. ‘फॅसिलिटेशन सेंटर’च्या माध्यमातून उद्योजकांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण होऊन औद्योगिक क्षेत्रातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सेवा सेतू अभियानात २५७८ ग्राहकांनी घेतला सूर्यघर योजनेचा लाभ

६०,८०४ वीजपुरवठा तक्रारींचे निराकरण; ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली पुणे, दि....

महापालिका मुख्य इमारतीत ‘बॉम्बस्फोट-अग्नितांडव’ मॉक ड्रिल; 15 मिनिटांत आग नियंत्रणात, अडकलेल्यांची सुटका

पुणे : जागतिक आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या...

पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान

पद्मश्री पोपटराव पवार ; श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे...

बावधन RMC मुक्त ! किरण दगडे पाटलांच्या RMC विरोधातील लढ्याला मोठे यश; पाच प्लांट्सवर कारवाई !

पुणे- बावधन बुद्रुकमधील RMC प्लांट्सविरोधात नगर सेवक किरण दगडे...