2 किलो 200 ग्रॅम सोन्याची चोरी; खडक पोलिसांनी 12 तासांत दोघांना जेरबंद

Date:

पुणे : रविवार पेठेतील एका सोन्याचे दागिने बनविणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातून तब्बल 2 किलो 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे चोरीला गेल्याची घटना घडली. सुमारे 2 कोटी 20 लाख रुपये किमतीच्या या चोरीचा खडक पोलिसांनी अवघ्या 12 तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याशिवाय अतिरिक्त 46 ग्रॅम सोनेही पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात. विविध सोनार त्यांच्याकडे दागिने तयार करण्यासाठी सोने देत असतात. 10 ऑक्टोबर रोजी रविवार पेठेतील त्यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले 2 किलो 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे चोरून नेण्यात आली. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 553/2026 नोंद करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये फिर्यादी राहत असलेल्या इमारतीखाली दोन संशयित व्यक्ती घुटमळताना दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोघांची ओळख पटवून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. हे दोघेही त्याच इमारतीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी मुस्तफा नजीर शेख (वय 36, रा. 161, केजीएन कॉम्प्लेक्स, पहिला मजला, रविवार पेठ, पुणे) आणि सरफराज उर्फ आवेज मैनुद्दीन शेख (वय 22, रा. 161, रविवार पेठ, काच आळी, पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. दोघे एकमेकांचे नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीनंतर दोघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीला गेलेले 2 किलो 200 ग्रॅम सोन्याचे दागिने व सोन्याची बिस्किटे पंचनाम्याने हस्तगत करण्यात आली. त्याशिवाय आणखी 46 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हस्तगत केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 कोटी 24 लाख 862 रुपये असून, या गुन्ह्यात पोलिसांनी चोरी गेलेल्या मालापेक्षाही अधिक मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, तसेच राहुल मखरे, जयसिंग दाढे, अशोक खाडे, संतोष मोहिते, विनोद शिंदे आणि पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, विकास पांडोळे, सैफ नदाफ, उमेश मठपती आणि सागर कुडले यांच्या पथकाने केली.

\

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दादांच्या नंतर ‘सोमेश्वर’वर वहिनींची सत्ता; सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची एकतर्फी घोडदौड

बारामती, 12 ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर...

२८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

अनुराधा ओक, प्रियांका इंगळे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार’; महिलांनी स्वतःसाठी...

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

अजितदादांचे सहकार क्षेत्रातील कार्य पुढे नेणार; सुनेत्रावहिनी पवार यांची...