श्रीसूक्त पठणातून पुणेकरांनी केली श्री महालक्ष्मी देवीची स्तुती

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद  
पुणे : माता माता की जय… चा नामघोष, शंख वादनाचा निनाद आणि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… च्या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नवरात्र उत्सवातील द्वितीयेची पहाट शेकडो महिला व पुरुषांनी सामुहिकरित्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाद्वारे मंगलमय झाली.

निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात झालेल्या सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रमाचे. यावेळी डॉ. सतिश देसाई, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय माता दी… च्या जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला. पठणाची सुरुवात शंखनाद पथकातील वादकांच्या शंखवादनाने झाली.  श्रीसूक्त म्हणजे काय? त्याचे महत्व आणि महती याविषयी देखील उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर ओंकार, अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्री सूक्ताचे तीन पाठ असे सामुदायिकरित्या पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.

विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, सामुहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात श्री महालक्ष्मी देवीची आराधना, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणाऱ्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.

त्या पुढे म्हणाल्या, श्रीसूक्त हे ऋग्वेदातील श्री महालक्ष्मी देवीच्या स्तुतीस समर्पित पवित्र वैदिक स्तोत्र आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि कल्याण यांचे प्रतीक असलेल्या देवी महालक्ष्मीच्या उपासनेत श्रीसूक्त पठणाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक पठणातून भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि सामूहिक मंगलभावनेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

अजितदादांचे सहकार क्षेत्रातील कार्य पुढे नेणार; सुनेत्रावहिनी पवार यांची...

मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

विशेष सघन पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; अंतिम मतदार यादी...

33 वर्षांनंतर जंतर-मंतरवर आता आंदोलनांना बंदी ; दिल्लीतील निदर्शनांसाठी अन्य तीन ठिकाणे निश्चित

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : देशाच्या राजधानीतील आंदोलनांचे सर्वाधिक...

प्रवासी वाहतुकीतून मालवाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई; २ लाख १५ हजारांचा दंड

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम पुणे, दि. १२...