पुणे – ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी त्यांच्या व्यवसायाला आर्थिक मदत करायला हवी असे मत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी उद्योगवर्धिनी या प्रदर्शनात उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या हडपसर शाखेच्या वतीने महिलांनी नुकतेच उद्योजकता, स्वावलंबन आणि नव्या संधींना प्रोत्साहन देणाऱ्या ‘उद्योगवर्धिनी’ या भव्य प्रदर्शनाच आयोजन केले होते, हे सलग 4थे वर्ष आहे, प्रसंगी दामले बोलत होते.
प्रसंगी व्यासपीठावर अखिल ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी अध्यक्षा केतकी कुलकर्णी, हडपसर शाखेचे अध्यक्ष कपिल कुलकर्णी, , नितीन गावडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिता काटे, सरचिटणीस अमृता मेढेकर, विदुला साठे, अमृता उपासनी, अश्विनी औरसंग,नगरसेवक मारुती तुपे आदी उपस्थित होते.
नोकरी करणारे नाही तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक निर्माण व्हायला हवेत, त्यासाठी परशुराम महामंडळ नक्कीच साह्य करेल असं आश्वासन दामले यांनी यावेळी दिले. यावेळी राखी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी प्रास्ताविक केले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून 45 पेक्षा जास्त महिला उद्योजीकांनी आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्यासाठी आणि नव्या संधी मिळवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे अशी भावना महिला उद्योजिकांनी व्यक्त केली. उद्योजकांना सन्मानपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले.
नगरसेवक नितीन गावडे आणि आबा तुपे उपस्थित होते. सर्वांनी उपस्थित उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायाची माहिती घेतली. त्यांच्या कल्पकतेचे आणि प्रयत्नांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुप्रसिद्ध सिनेतारका अभिज्ञा भावे व शर्मिष्ठा राऊत यांनी या कार्यक्रमास भेट देऊन महिलांचे कौतुक केले व कार्यक्रमाची उंची वाढवली.
उद्योगवर्धिनीचे यशस्वी आयोजन महिला आघाडीच्या अनिता काटे, अमृता मेढेकर, विदुला साठे, अमृता उपासनी, अश्विनी औरसंग, आदींनी केले.

