24 वर्षांनंतर भारतीय मुलींची सुवर्णझेप; मुलांना टाकले मागे

Date:

एशियाडमध्ये महिलांच्या नावावर 11, पुरुषांच्या नावावर 7 सुवर्णपदके; भारताची 21 सुवर्णांसह 85 पदकांची कमाई

जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष खेळाडूंना मागे टाकले. भारताने यंदा एकूण 21 सुवर्णपदके जिंकली असून त्यापैकी महिलांच्या स्पर्धांमध्ये 11, पुरुषांच्या स्पर्धांमध्ये 7 आणि मिश्र स्पर्धांमध्ये 3 सुवर्णपदके मिळाली आहेत.

भारताने 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशा एकूण 85 पदकांसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपली मोहीम पूर्ण केली. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला. 2023 मध्ये हांगझोऊ येथे भारताने 28 सुवर्णांसह विक्रमी 107 पदके जिंकली होती. त्या तुलनेत यंदा भारताची एकूण पदकसंख्या आणि सुवर्णपदकांची संख्या कमी झाली असली, तरी अनेक क्रीडा प्रकारांत ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्यात आली.

24 वर्षांनंतर महिला खेळाडू सुवर्णपदकांत पुढे

भारतीय महिला खेळाडूंनी पुरुषांपेक्षा अधिक सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी 24 वर्षांनंतर केली. यापूर्वी 2002 मध्ये बुसान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक सुवर्णपदके मिळवली होती. यंदा महिलांच्या नावावर 11 तर पुरुषांच्या नावावर 7 सुवर्णपदके जमा झाली.

नेमबाजी-अ‍ॅथलेटिक्समध्ये मोठी घसरण

2023च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेत नेमबाजी आणि अ‍ॅथलेटिक्स हे भारतासाठी सुवर्णपदकांचे प्रमुख स्रोत ठरले होते. नेमबाजीत भारताने 7 तर अ‍ॅथलेटिक्समध्ये 6 सुवर्णपदके मिळवली होती. यंदा मात्र नेमबाजीत 3 आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये केवळ 1 सुवर्ण मिळाले. त्यामुळे या दोन क्रीडा प्रकारांतच मागील स्पर्धेच्या तुलनेत भारताची 9 सुवर्णपदके कमी झाली.

स्क्वॉश, टेनिस, बॅडमिंटन आणि घोडेस्वारी या खेळांमधूनही मागील स्पर्धेप्रमाणे सुवर्णपदकांची भर पडली नाही. त्यामुळे भारताला 2023 मधील 28 सुवर्णांचा विक्रम गाठता आला नाही.

बॉक्सिंग-कुस्तीने भरून काढली उणीव

दुसरीकडे बॉक्सिंग आणि कुस्तीमध्ये भारताने यंदा उल्लेखनीय सुधारणा केली. बॉक्सिंगमध्ये भारताने तीन, तर कुस्तीमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली. मागील आशियाई स्पर्धेत या दोन्ही क्रीडा प्रकारांत भारताला सुवर्णपदक मिळाले नव्हते.

तिरंदाजीतही भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. महिला कंपाउंड संघाने अंतिम फेरीत 238 गुणांची नोंद करत जागतिक विक्रमाची बरोबरी केली.

क्रिकेट, हॉकी आणि कबड्डीत भारतीय दबदबा

सांघिक क्रीडा प्रकारांत भारताने पुन्हा आपली ताकद दाखवून दिली. क्रिकेट, हॉकी आणि कबड्डीमध्ये भारताच्या संघांनी सुवर्णपदकांची कमाई केली. विशेषतः पुरुष हॉकी संघाने मलेशियाचा 5-1 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवली.

महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनीही सुवर्णपदके जिंकून भारताच्या पदकसंख्येत महत्त्वाची भर घातली.

चीनचे वर्चस्व कायम

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेवर चीनचे वर्चस्व यंदाही कायम राहिले. चीनने तब्बल 169 सुवर्णांसह एकूण 341 पदके जिंकली. यजमान जपानने 83 सुवर्णपदकांसह दुसरे स्थान मिळवले.

1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपासून चीन सातत्याने पदकतालिकेत अव्वल राहत आला आहे. भारताने मात्र सलग दुसऱ्या स्पर्धेत पदकतालिकेतील चौथे स्थान कायम ठेवले.

2023च्या हांगझोऊ स्पर्धेतील विक्रमी 107 पदकांच्या तुलनेत भारताला यंदा 22 पदके कमी मिळाली, तर सुवर्णपदकांची संख्या 28 वरून 21 वर आली. मात्र महिला खेळाडूंची सुवर्णझेप, बॉक्सिंग-कुस्तीतील सुधारणा आणि सांघिक क्रीडा प्रकारातील दमदार कामगिरी ही भारतासाठी या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये ठरली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव...

युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर...