एका मंडळाला दोनच ढोलताशे पथक मंजुरी:एका चौकात १० मिनिटांपेक्षा जास्त थांबू देणार नाही-पोलीस आयुक्त

Date:

१० हजार पोलिसांचा बंदोबस्त …

पुणे- पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन दिनी बंदोबस्ताच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले कि एका मंडळाला दोनच ढोलताशे पथक मंजुरी देण्यात आली आहे एका चौकात १० मिनिटांपेक्षा जास्त थांबता येणार नाही, विसर्जनासाठी १० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून , लक्ष्मी रस्ता ,टिळक रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावरून केवळ ६३८ मंडळांना मिरवणुकीस परवानगी देण्यात आली आहे.मिरवणूक एकूण किती अवधी चालेल या प्रश्नाला मात्र पोलीस आयुक्तांनी उत्तर देताना सांगितले कि आमच्या दृष्टीने मिरवणूक किती वेळ ,काल चालेल याला महत्व देण्यापेक्षा ती शांततापूर्ण , भाव पूर्ण वातावरणात कशी सुरु राहील याला प्राधान्य देणे गरजेचे आहे त्यास आम्ही प्राधान्य देणार ………………… नेमके काय म्हणाले पोलीस आयुक्त ऐका त्यांच्याच शब्दात ……………..

यंदाची गणेश विसर्जन मिरवणुक किती वेळ चालेल ? ढोल-ताशा पथकांतील वादकांच्या संख्येवर मर्यादा असेल कि नसेल.हे स्पष्ट झाले नसले तरीही मात्र, कोणत्याही चौकात एका पथकाला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वादन करता येणार नाही आणि 15 मिनटाहून जास्त वेळ थांबता येणार नाही. प्रत्येक मंडळाला मिरवणुकीत दोनपेक्षा जास्त पथके ठेवता येणार नाहीत असे आज स्पष्ट झाले आहे. आज गणेश विसर्जन मिरवणुकीतील बंदोबस्त यावरील माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

मिरवणुकीत टोल, प्रेशर मिड, लेझर लाईट आणि प्लाझ्मा यांवर बंदी घालण्यात आली आहे. आवाजाची ठरवून दिलेली डेसिबल मर्यादा पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. आवाजाची पातळी तपासण्यासाठी ११२ पथके नेमण्यात आली आहेत. उत्सवकाळात ध्वनिप्रदूषणाचे आतापर्यंत २१ गुन्हे दाखल झाले आहेत.

गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शहरातील इतर भागांतील तसेच खासगी कॅमेऱ्यांचे फीडही पोलिस यंत्रणेशी जोडण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयातील एकात्मिक नियंत्रण कक्षातून चोवीस तास देखरेख ठेवली जाईल. विसर्जन मार्गावरील चारशेहून अधिक कॅमेऱ्यांचे चित्रण पाहता येणार आहे. गर्दीचे निरीक्षण, वाहतुकीतील अडथळे शोधणे आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी एआय-आधारित व्हिडिओ विश्लेषण, ड्रोन, जीपीएस ट्रॅकिंग आणि मोबाइल नियंत्रण वाहनांचा वापर केला जाईल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची मिरवणूक अधिक शिस्तबद्ध होईल, असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अर्जुन रामपाल आणि प्रियमणीचा ‘द ब्लाइंड गेम’ ११ नोव्हेंबरला ZEE5 वर; दिवंगत दिग्दर्शक संगीथ सिवन यांचा अखेरचा चित्रपट!

पाच कोटी रुपयांच्या रहस्याभोवती फिरणारी गुन्हेगारी आणि थरारकथा; मैत्री,...

तुळजाभवानी मंदिर परिसरात आगीचा भडका! दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ; २४ तासांत दुसरी घटना

दिवाळी पाडव्याच्या दिवशी बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर आग; वाळलेली...

‘गोकुळ’वर अखेर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील नवे अध्यक्ष; सतेज पाटलांना मोठा धक्का

१६ विरुद्ध १३ मतांनी महायुतीची बाजी; निवडून आलेल्या संचालकांमध्ये...