महिला API ला २८ लाखाच्या लाच प्रकरणी पकडले

Date:

पुणे :पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली झाल्याने त्यांना पुणे शहर पोलीस दलातून शुक्रवारी कार्यमुक्त करण्यात आले. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वी महिला सहायक पोलीस निरीक्षकानी खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉरनॉट जवळ २८ लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या घटनेनंतर या महिला पोलीस अधिकार्‍याची पोलीस आयुक्तालयातील रुमचा सर्च घेतला जात आहे.

वैशाली तोटेवार (API Vaishali Totewar) असे या महिला अधिकार्‍याचे नाव आहे. त्यांची पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती होती. त्यांच्याकडे ८ ते ९ तक्रार अर्ज तपासासाठी देण्यात आले होते. त्यांचा तपास सुरु असतानाच त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढतीवर मुंबई लोहगाव पोलीस येथे बदली करण्यात आली होती. त्यांना पुणे पोलीस दलातून कालच कार्यमुक्त करण्यात आले. परंतु, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची या अगोदरच कारवाई सुरु झाली होती. त्यांनी एका तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये २८ लाखांची लाच मागितली होती. त्यात एका खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉरनॉट येथे बोलवले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २८ लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या खासगी व्यक्तीला पकडले. पाठोपाठ वैशाली तोटेवार यांना ताब्यात घेतले. पाठापोठ दुसर्‍या दोन पथकांनी पोलीस आयुक्तालयातील त्यांच्या कार्यालयातील रुमची तर आणखी एका पथकाने त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली असून ही कारवाई अद्याप सुरु आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचार

मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत मतदारांना मतदानाचे आवाहन भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी...

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

पुणे, दि.२१: स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे...

पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर दसरा उत्साहात

श्रीनगर : काश्मीरमधील सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहअस्तित्वाची परंपरा...

राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी व्यंगचित्रकार संमेलनाच्या लोगोचे अनावरण

पुण्यात २५ ते २७ डिसेंबरदरम्यान संमेलन; ज्येष्ठ व्यंगचित्रकार लहू...