पुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधा

Date:

पुणे, दि.१७ : नीती आयोग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पुणे ग्रोथ हब आराखड्याचा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे गुरुवारी आढावा घेतला. संबंधित विभागांनी वारंवार बैठका घेऊन समन्वयाने अंतिम आराखडा सादर करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, सल्लाकार कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते.

पुणे ग्रोथ हबमुळे स्टार्टअप, आयटी आणि उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ग्रोथ हब प्रकल्पांचे पुणे आर्थिक क्षेत्रासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन लक्षात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करावे. प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांशी विभागनिहाय सविस्तर बैठका आयोजित करुन प्रत्येक विभागाचा भविष्यातील दृष्टीकोन, गरजा व प्राधान्यक्रम समजून घेऊन या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. करीर यांनी दिल्या.

यावेळी प्रकल्पांची एकूण प्रगती व पूर्ण झालेले टप्पे, आर्थिक व जीवनमान निर्देशांकांची निर्मिती, उत्पादन, पायाभूत सुविधा, संपर्क व नागरी विकास या क्षेत्रांवरील सखोल अभ्यास व अंमलबजावणीचा दृष्टीकोन, आर्थिक, जीवनमान, शाश्वतता व समावेशकता यांवर आधारित डेटा-आधारित नियोजन, ११ क्षेत्रांमध्ये ५० हून अधिक शासकीय बैठक व ८० हून अधिक खाजगी क्षेत्र संवादाद्वारे व्यापक सल्लामसलत, प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रकल्पांची ओळख, शासन-खाजगी भागीदारी व गुंतवणूक नियोजनावर भर आणि एकात्मिक प्रादेशिक नियोजनावर विशेष लक्ष याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ आता OTT वर पाहता येणार; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

चित्रपटगृहात जाऊन प्रहार पाहायचा राहून गेला असेल, आपल्या लाडक्या...

डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट; जीवन...

पाऊस पडूनही खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा घटला; पाच दिवसांत ०.६१ टीएमसी पाणी कमी!

चार धरणांत अवघा ८०.५२ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४.९३ टीएमसी...