केनडियर बाय कल्याण ज्वेलर्सने हिंजवडीमध्ये नवे स्टोर सुरु करून पुण्यामध्ये विस्ताराची आगेकूच कायम राखली

Date:

हिंजवडी, २ डिसेंबर,२०२४: केनडियर, कल्याण ज्वेलर्सचा हा ब्रँड ट्रेंडी व आधुनिक डिझाइन्ससाठी सुप्रसिद्ध आहे. या लाइफस्टाइल ज्वेलरी ब्रँडने हिंजवडीमध्ये आपले नवीन शोरूम सुरु केले आहे. पुण्यामध्ये हिंजवडीच्या गजबजलेल्या टर्मिनल वन भागात सुरु करण्यात आलेले हे पुणे शहरातील दुसरे आणि भारतातील ४९ वे केनडियर स्टोर आहे.

वजनाला हलके, बहुउपयोगी आणि जेन झेड, नोकरी–व्यवसाय करणाऱ्या महिला आणि फॅशन–फॉरवर्ड पुरुषांची आवडनिवड, गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलेले दागिने ही केनडियरची ओळख आहे. याठिकाणी प्रत्येक दागिन्यांमध्ये आधुनिक स्टाईल आणि परवडण्याजोग्या किमती यांची सांगड घालण्यात आली आहे, ग्राहकांसाठी हे दागिने म्हणजे स्व–अभिव्यक्तीचे सहजसोपे माध्यम आहेत. फक्त १०,००० रुपयांपासून सुरु होणाऱ्या किमती असलेल्या केनडियर कलेक्शनमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध करवून देण्यात आले आहेत, विचारपूर्वक दिली जाणारी भेट म्हणून, प्रत्येक प्रसंग कायमचा आठवणीत राहावा यासाठी हे दागिने अगदी सुयोग्य आहेत.

हिंजवडीमध्ये नवीन शोरूमचे उदघाटन ब्रँड विस्तार आणि वृद्धीबरोबरीनेच ग्राहकांसाठी आग्रहाचे आमंत्रण आहे की त्यांनी याठिकाणी येऊन अशा दागिन्यांच्या खरेदीचा आनंद घ्यावा ज्यांना शैली आणि अर्थ यांचा मिलाप करून तयार करण्यात आले आहे. हे स्टोर आपल्याला एका नव्या जगात घेऊन जाते, याठिकाणी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व, आवडनिवड, जीवनशैली यांना अनुरूप दागिने मिळतात.

नवीन स्टोरच्या निमित्ताने केनडियरने एका विशेष लॉन्च ऑफरची देखील घोषणा केली आहे. डायमंड मेकिंग चार्जेसवर १००% पर्यंतची सूट, सर्वात कमी गोल्ड रेट, गोल्ड मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंतची सूट आणि प्लॅटिनम मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंतची सूट मिळवण्याची सुवर्णसंधी ब्रँडने उपलब्ध करवून दिली आहे. सॉलिटेयर खरेदी करायचे असतील तर स्टोनच्या किमतींवर ३०% पर्यंतची सूट देखील मिळू शकते. आधुनिक दागिन्यांची नवी व्याख्या रचणारे आणि ऑफर्सना अजूनचबनवणारे कलेक्शन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

डिजिटल–फर्स्ट ब्रँड ते ओम्नीचॅनेल रिटेलरपर्यंतच्या या प्रवासात, केनडियरने आपल्या ग्राहकांना, ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर अतिशय सुविधाजनक खरेदी अनुभव प्रदान करण्याची बांधिलकी कायम राखली आहे. कल्याण ज्वेलर्सच्या मजबूत समर्थनासह केनडियरने आपले विस्ताराचे आणि सजावटीबरोबरीनेच वैयक्तिक स्टाईल व स्वयं–अभिव्यक्तीचा अभिन्न भाग बनणारे दागिने प्रस्तुत करण्याचे मिशन सुरु ठेवले आहे.

हिंजवडीमध्ये नवीन स्टोरसह, केनडियरने ग्राहकांना वेगवेगळी आवडनिवड पूर्ण करणारे, अतिशय आकर्षक आणि अनोखे दागिने प्रस्तुत करण्याची बांधिलकी कायम राखली आहे, याठिकाणी प्रत्येक दागिना स्टाईलची कहाणी सांगतो आणि तुमच्या जीवनातील खास क्षणांचा अविभाज्य भाग बनतो. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी प्रयत्न करू; आ. नीलम गोऱ्हे

शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनात २५० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रे पुणे: शस्त्रांची...

रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी! वाढत्या आगीच्या घटनांनंतर महापालिकेचा मोठा निर्णय

दिवाळीच्या दिवशी आगीच्या १४२ वर्दी; त्यापैकी १३७ घटना फटाक्यांशी...

‘ अराजकवादी कोण? आम्ही कि तुम्ही ’ मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

‘गोकुळ’वर सत्तेच्या जोरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न; भाजपकडून लोकशाही मूल्यांची...

फटाक्याच्या स्फोटात १० वर्षीय मुलाचा करुण अंत!

ऐन दिवाळीत दिल्लीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; रुग्णालयावर कुटुंबीयांचा हलगर्जीपणाचा...