ब्रिटिशकालीन कालबाह्य कायदे बदलले जावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आग्रही प्रतिपादन

Date:

विधी महाविद्यालयांनीसंवाद कौशल्यशिकवण्यावर भर द्यावा: न्या. दीपंकर दत्ता

मुंबई, दि. 13: स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे होत आहेत, तरीदेखील आपल्या देशात अनेक ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

जुहू विले पार्ले मुंबई येथील मा कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. १३) संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी न्या. दत्ता यांच्या पत्नी झुमा दत्ता, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घेलानी, विश्वस्त जयंत घेलानी, जनक ठक्कर व डॉ. मिनू मदलानी प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी, विधिज्ञ सतीश मानेशिंदे व इतर निमंत्रितदेखील यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन सर्वंकष अध्ययन केले पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचादेखील अभ्यास केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे तसेच विधी विद्यार्थ्यांनी व वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

‘महाविद्यालयांनीविद्यार्थ्यांना मौखिक व लेखी संवाद कौशल्यशिकवण्यावर भर द्यावा‘ : न्या. दीपांकर दत्ता

विधी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मौखिक व लेखी संवाद कौशल्य शिकवण्यावर भर द्यावा. त्यांचेसाठी समूह चर्चा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, अतिथी व्याख्याने, प्रकल्प व कार्यशाळांचे आयोजन करून त्यांच्या शिक्षणाच्या कक्षा रुंदवाव्या असे न्या. दत्ता यांनी सांगितले.

पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीत प्रवेश घेऊन मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्त होणारे आपण पहिले विधी पदवीधर ठरलो असे न्या. दीपंकर दत्ता यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षणाला अंत नसतो; न्यायाधीश हा आयुष्यभर विद्यार्थी असतो कारण तो कायद्यांची व्याख्या व उकल विविध रूपाने शिकतच असतो असे न्या. दत्ता यांनी सांगितले.

जीवनात मोठे झाले तरीही विद्यार्थ्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवावे, चिकाटी व संयम बाळगावा तसेच त्याग व सेवा या गुणांचा अंगीकार करून राष्ट्रसेवा करावी असे आवाहन न्या. दत्ता यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. महेंद्र घेलानी यांनी संस्थेची माहिती दिली व अतिथींचा परिचय करून दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...