विसर्जन मिरवणूकीसाठी ८ हजार पोलिसांचा ताफा तैनात -पोलीस आयुक्त (व्हिडीओ)

Date:

पुणे- मानाच्या गणपतींची टिळक चौकातून सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर यंदा मानाच्या गणपतीमध्ये ३ ढोल ताशा पथक आणि इतर मंडळाकरीता २ पथकांचीच परवानगी देण्यात आली आहे. या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगत यंदाच्या वर्षीही मागीलवर्षी प्रमाणेच गणेश विसर्जन मिरवणूक पार पडेल. असा विश्वास  पोलिस आयुक्त के. वेकंटेशम यांनी आज पत्रकार परिषदेत केले.८ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. तसेच मागील वर्षीपेक्षा यंदा लवकर मिरवणूक मार्गी लावण्यावर विशेष भर असणार आहे, अशी माहितीही पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी  दिली.

संभाजी पोलिस चौकीमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेस सहपोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. के. वेंकटेशम म्हणाले, की मानाच्या पाच मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक दरवर्षीच्याच वेळेत अर्थात सकाळी दहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल.

प्रमुख विसर्जन मिरवणुकीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावर पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सेक्टरनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या मार्गावरील मिरवणुकीमध्ये ६०२ मंडई सहभागी होतात. याठिकाणी ३ हजार १३८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच या प्रमुख मार्गावर व्हिडीओ वॉल उभारण्यात येणार आहेत.

या मार्गावरील मिरवणुकीवर २६९ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये मुख्य कंट्रोल रूम असेल. गुरूवारी विसर्जनाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बगाडे रोड, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रोड, केळकर रस्ता, गुरूनानक रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, नळ स्टॉप ते खंडोजीबाबा चौक दरम्यानचा कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक ते जेधे चौक रस्ता, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक आणि प्रभात रस्ता टप्प्याटप्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन डॉ. पंकज देशमुख यांनी यावेळी केले.

या मिरवणुकीत सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष असणार आहेच. पण पोलिसांकडे असणार्‍या ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र, चित्रीकरणासाठी खासगी ड्रोनला परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी व्यंकटेशम यांनी यावेळी स्पष्ट केले. मानाच्या गणपतींची टिळक चौकातून सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर यंदा मानाच्या गणपतीमध्ये ३ ढोल ताशा पथक आणि इतर मंडळाकरीता २ पथकांचीच परवानगी देण्यात आली आहे. या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील मध्य भागात वाहने आणता येणार नाही. या वाहनांसाठी रिंगरोडद्वारे मार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे मिरवणुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील मिरवणूक पाहण्यास जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून भावीक येत असतात, अशा भाविकांना कोणत्या परिसरात वाहतूक कोंडी आहे किंवा वाहतूक वळवण्यात आली आहे याची माहिती पुणे ट्राफिक वॉचवर मिळणार आहे.

ढोल पथकांवर निर्बंध
ढोल पथकांमधील वादक आणि सहकारी असे १०० जणांचे पथकाला परवानगी देण्यात आली आहे. पथकात सहभाग असलेल्यांना पोलिसांचे पासेस बंधनकारक केले आहे. ढोल पथकांना शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मानाच्या मंडळासमोर अधिकाअधिक तीन तर अन्य मंडळांसमोर दोनच ढोल पथकांना परवानगी दिली असून त्यांनी नमूद केलेल्या चौकातच वादन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. एका मंडळामध्ये सहभागी झालेल्या ढोल पथकांना अन्य मंडळांत वादनाची परवानगी देण्यात येणार नाही, असे सह पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र शिसवे यांनी नमूद केले.

पोलिसांचा बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीसाठी चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, १२ डीसीपी, २७ एसीपी, १५० पोलिस निरीक्षक, ४६१ उपनिरीक्षक, ७,४५७ पोलिस कर्मचारी, दोन एसआरपीएफच्या तुकड्या, १६ शीघ्र कृती दल, ७ बीडीडीएसच्या तुकड्या, ७०० होमगार्ड, ३० हजार स्वंयसेवक, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी, एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी बंदोबस्तावर असतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देवाची उरुळीत गार्डन वेस्ट प्रकल्पासाठी ५३ लाखांच्या खर्चास मंजुरी

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे : देवाची...

१००० चौ.फुटांपर्यंतच्या अनधिकृत घरांना एकपट कर

पुणे : महापालिका हद्दीतील १००० चौ.फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत...

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे; खो-खोमध्ये (महिला) विजेतेपद

पुणे, दि. ७ मे २०२४: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने सलग दुसऱ्या दिवशीही दबदबा ठेवत अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या खो-खोच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले आहे. तर कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत तर खो-खो व बास्केटबॉलमध्ये पूर्वउपांत्य फेरीत महावितरणच्या संघाने प्रवेश केला आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी (दि. ७) खो-खोच्या महिला गटात महावितरण विरुद्ध राजस्थान असा अंतिम फेरीचा सामना झाला. यात महावितरणच्या कर्णधार भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये दमदार कामगिरी करीत सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या डावात १२ विरुद्ध ५ गुणांची आघाडी घेत दुसऱ्या डावात महावितरण संघाने सहा मिनिटे राखून खो-खोचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खो-खोच्या पुरुष गटामध्ये महावितरण संघाने (१५) हरियाणा संघाचा (४) ११ गुणांनी सहज पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र राजस्थान (६) विरुद्ध महापारेषण (५) संघात तुल्यबळ लढत झाली व राजस्थानने एक गुणाने निसटता विजय मिळवला. आता महावितरण विरुद्ध महापारेषण आणि हरियाणा विरुद्ध राजस्थान अशी अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये सातत्य कायम ठेवले असून सर्व साखळी सामन्यांत वर्चस्व मिळवले आहे. महापारेषणचा उत्कृष्ट खेळाडू विशाल सावंत व इतर सहकाऱ्यांवर आता बलाढ्य महावितरण संघाचा पराभव करण्याचे आव्हान आहे. कबड्डीच्या पुरुष गटामध्ये पूर्वउपांत्य फेरीत बीएसईएस राजधानी दिल्ली संघ (४९) विरुद्ध महापारेषण (३९) यांच्या अतिशय अटीतटीची लढत झाली. केवळ तीन गुणांनी महापारेषणला पराभव पत्कारावा लागला. दिल्लीच्या संजीव छिकारा, हरदेव शर्मा, रवी प्रकाश व अनिल यांनी आक्रमक पवित्रा घेत महापारेषणचे शेवट्या मिनिटापर्यंत सुरु असलेले आक्रमण थोपवून धरले. यानंतर हिमाचल प्रदेश संघाने (३२) मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट संघाचा (७) सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर महावितरण संघातील (३०) दीपक माने, अमित जाधव, नीलेश ठाकूर, अभिषेक नर, अजय शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्याने तेलंगणा ट्रान्समिशन संघाचा (११) १९ गुणांनी आणि हरियाणा संघाने (४८) टाटा पॉवर मुंबई संघाचा (१७) पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बास्केटबॉलच्या साखळी सामन्यांनी या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगत वाढली. यात महावितरण (३४) विरुद्ध तेलंगणा (२४) लढतीत महावितरणच्या पंकज गेडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले, आशिष खानापुरे यांनी सामन्यावर नियंत्रण ठेवत विजय मिळवला. यासोबतच सुरजितसिंग, हरप्रितसिंग, सतेंदरसिंग यांच्या आक्रमणामुळे पंजाब संघाने (२१) उत्तराखंड संघाचा (८) पराभव केला. तर हरियाणा संघ (५४) विरुद्ध महापारेषण (६) लढतीत हरियाणाने एकतर्फी विजय मिळवला.