५१% घरखरेदीदार आता कर्ज परतफेडीसाठी १५ वर्षांपेक्षा कमी कालावधी निवडत आहेत

Date:

मॅजिकब्रिक्स होम लोन्स कन्ज्युमर पोलचा निष्कर्ष

–          भारतात सर्वाधिक निवडला जाणारा गृहकर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्षे आहे. 

–          सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी फक्त १६% लोकांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीची निवड करू असे सांगितले आहे.

नोएडामे २०२१:  सध्या गृहकर्जांवर आजवरचे सर्वात कमी व्याज दर आकारले जात आहेत आणि जवळपास ५१% घरखरेदीदार १५ वर्षांपेक्षा कमी कर्ज कालावधी निवडणे पसंत करत आहेत.  मॅजिकब्रिक्सने नुकत्याच केलेल्या होम लोन्स कन्ज्युमर पोलमध्ये हे आढळून आले आहे.

घरखरेदीदार गृहकर्जांच्या परतफेडीसाठी १० वर्षांचा कालावधी निवडण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचा या सर्वेक्षणाचा (सॅम्पल साईझ ५००) निष्कर्ष आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी २६% लोकांनी तसे मत नोंदवले आहे, तर २५% लोकांनी १० ते १५ वर्षे आणि २३% लोकांनी १५ ते २० वर्षे कालावधी निवडू असे सांगितले आहे. जवळपास १६% लोकांचे मत आहे की, ते २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज घेतील तर फक्त १०% लोकांनी २० ते २५ वर्षांसाठी कर्ज घेण्याची इच्छा दर्शवली आहे.मॅजिकब्रिक्स होम लोन्सवर निदर्शनास आलेल्या ग्राहकांच्या वागणुकीवरून असे समजते की, गृहकर्जांसाठी बहुतांश मागणी बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि पुणे या प्रमुख निवासी बाजारपेठांमधून येत आहे.      

ग्राहकांच्या सवयी आणि प्राथमिकतांबाबत प्रतिक्रिया देताना मॅजिकब्रिक्सचे सीईओ श्रीसुधीर पै यांनी सांगितले, मध्यम आणि उच्च श्रेणीतील घरांसाठी गृहकर्जांच्या मागणीत वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.  घरून काम करावे लागत असल्याने अतिरिक्त खोलीची गरजसर्कल दर  स्टॅम्प ड्युटीमध्ये घट आणि कमी व्याज दर असे अनेक घटक याला कारणीभूत ठरत आहेत.  सध्या गृहकर्जांवरील व्याज दर सरासरी .६५ ते .९० टक्क्यांच्या दरम्यान असल्याने या दराने आपल्या कर्जाची परतफेड जितक्या लवकर करता येईल तितके बरे अशी भावना ग्राहकांमध्ये आढळून येत आहे.  त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांपैकी जवळपास ५०लोक परतफेडीसाठी १० वर्षांपर्यंत किंवा १० ते १५ वर्षांचा कालावधी निवडत असूनया आर्थिक जबाबदारीतून शक्य तितक्या लवकर मुक्त होण्याला प्राथमिकता देत आहेत.”

गेल्या एक दशकाच्या किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या तुलनेत सध्याचे गृहकर्जांवरील व्याज दर सर्वात कमी आहेत त्यामुळे तज्ञांच्या मतानुसार सर्वोत्तम रियल इस्टेट डील्ससाठी वाटाघाटी करण्यासाठी, व्यवहारांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे.  अनेक सार्वजनिक व खाजगी बँका आणि इतर आर्थिक संस्थांनी त्यांचे गृहकर्जांवरील व्याज दर कमी केले आहेत, यामुळे ग्राहकांच्या घरखरेदीच्या महत्त्वाकांक्षेला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे.  भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये रेपो रेटमध्ये काहीही बदल न करता तो ४% ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने कितीतरी बँकांनी घरखरेदीच्या वाढत्या मागणीला अधिक तेजी देण्यासाठी गृहकर्जांचे व्याज दर ७% पेक्षा कमी ठेवले आहेत.

मॅजिकब्रिक्स होम लोन्स घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना आपले स्वप्नातील घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करता यावे यासाठी मध्यम ते दीर्घ मुदतीची कर्जे मिळवण्यात मदत करते.  याठिकाणी २० पेक्षा जास्त बँकांकडून स्वस्त गृहकर्जे सहज आणि वेगवान पद्धतीने मिळवता येतात.  उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम ऑफर्स, दर यांची तुलना करण्यात, अर्ज प्रक्रियेमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन सहायता मिळवणे आणि बॅलन्स ट्रान्सफर्स व संपत्तीवरील कर्ज यांच्यासहीत गृहकर्जांच्या विशाल श्रेणीचे लाभ मिळवण्यात मॅजिकब्रिक्स होम लोन्स ग्राहकांना मदत करते.   

मॅजिकब्रिक्सभारतातील पहिल्या क्रमांकाची प्रॉपर्टी साईट

मॅजिकब्रिक्स ही भारतातील पहिल्या क्रमांकाची साईट आहे.  दर महिन्याला २० मिलियनपेक्षा जास्त लोक मॅजिकब्रिक्सला भेट देतात, याठिकाणाच्या सक्रिय प्रॉपर्टी लिस्टिंग्स १.४ मिलियन्सपेक्षा जास्त आहेत.  घर विकू आणि खरेदी करू इच्छिणाऱ्यांना एकमेकांसोबत पारदर्शक पद्धतीने संपर्क करण्यात सक्षम करणारा हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे.  यादृष्टीने मॅजिकब्रिक्सने अनेक अभिनव वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने, कन्टेन्ट आणि संशोधन सेवा सुरु केल्या आहेत, ज्यामुळे त्यांना सर्वात मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण करण्यात मदत मिळाली आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या नवव्या आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली, २३ मार्च २०२५ : संसद सदस्यांसाठी प्रतिष्ठित जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन...

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवाला लोकसंस्कृतीचा कलाविष्कार – आ. उमा खापरे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक...

राजकुमार ठाकूर यांनी मिळविला सहस्रबुद्धे चषक कॅरम स्पर्धेत विजय आणि ठरले चषकाचे मानकरी

पुणेपटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे...