तू सौभाग्यवती हो या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे. आणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे.

तू सौभाग्यवती हो मालिकेत हा खास विवाह सप्ताह १ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ७ वा. सोनी मराठीवर प्रदर्शित होईल .