उधारीचा धंदा पुणेकरांना खड्डयात घालणार..
पुणे- नुकताच गुजरात दौरा झालेला नदीसुधार प्रकल्प, पीपीपी चे रस्ते ,वैद्यकीय महाविद्यालय , २४ बाय ७ चा पाणीपुरवठा प्रकल्प ,बाणेर-वारजेचे १००० कोटीचे हॉस्पिटल,वडगाव शेरी येथील अॅमिनीटी स्पेसच्या जागेवर एका बांधकाम व्यावसायीकाला शाळा बांधण्याची परवानगी देण्याचा ठराव अशा विविध सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या कामांची, प्रस्तावांच्या प्रवासाची चौकशी आणि महापालिकेतील ५ पदाधिकारी यांनी या संदर्भात केलेल्या हालचाली, त्यांचे संपर्क (सीडीआर) यांची चौकशी करण्यासाठी उद्या आम्ही लाचलुचपतविरोधी विभागाकडे तक्रार करणार आहे.असे येथे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले . भाजपच्या ज्या ३/४ लोकांच्या वर्तुळात सत्ता फिरत राहिली ती आपल्या पुढच्या १० पिढ्यांच्या कल्याणाचा धंदा करत आली असून , महापालिकेची ऐपत नसताना उधारीने त्यांनी पुढील ५ वर्षे महापालिकेला पैसे फेडत बसावे लागेल अशा पद्धतीची ठेके लादून पुण्याला खड्ड्यात घालणारा कारभार केला आहे. या सर्वांची चौकशी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
या ५ हि जणांचे मोबाईल कॉल, संपर्क , सीडीआर यांची तपासणी करावी अशी मागणी करून जगताप म्हणाले कि , आम्ही काही पुरावेही देऊ , आज त्यांची नावे सांगणार नाही पण एसीबी कडे निश्चित त्यांची नावे देऊ .पुढील ५ वर्षे कोणाचीही सत्ता आली तरी त्यांना मागचेच हप्ते देत बसावे लागेल अशा पद्धतीचा कारभार करून या ५ जननी आपापल्या पुढील पिढ्यांची सोय करून ठेवली आहे. आणि काही प्रमाणात आता निवडणुकीला फंडिंग व्हावे यादृष्टीने देखील ठराव आणले जात असल्याचा आरोप जगताप यांनी केला . अॅॅमिनिटी स्पेस ची विक्री , रुग्णालये उभारताना काहींशी करून ठेवलेली पार्टनरशिप, महापालिकेची जागा , कर्ज हि महापालिकेवर आणि प्रत्यक्षात मालकी,कमाई दुसऱ्याच्या कक्षेतील या सर्व आक्षेपार्ह बाबींचा आणि हजार कोटीच्या हॉस्पिटलच्या प्रस्तावाचा प्रवास तपासून पाहावा असे आमचे म्हणणे आहे .