· गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल- ऑगस्ट २०२१ च्या तुलनेत कंपनीने नोंदवली १५८ टक्क्यांची वाढ
· नेपाळमधील व्यावसायिक कामकाजासह कंपनी आता जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सज्ज
वडोदरा – वॉर्डविझार्डइनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. या पहिल्या बीएसई नोंदणीकृत इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक आणि देशातील आघाडीचा इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड ‘जॉय ई बाइक’ बनवणाऱ्या कंपनीने ऑगस्ट २०२२ मध्ये १७२९ युनिट्सची विक्री केली आहे.
कंपनीने एप्रिल- ऑगस्ट २०२२ दरम्यान १२,४५४ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील या कालावधीच्या तुलनेत कंपनीने यंदा १५८ टक्के वाढ नोंदवली असून ४८३५ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली आहे.
ऑगस्ट २०२२ मधील विक्री कामगिरीविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, ‘जास्तीत जास्त राज्यांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व इलेक्ट्रिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आवश्यक धोरणे तयार केली जात असल्यामुळे हे क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. वॉर्डविझार्डमध्ये आम्ही देशभरातील टचपॉइंट्सची संख्या वाढवून आमचे स्थान बळकट करत आहोत. जगभरात वाढत असलेली मागणी लक्षात घेत आम्ही लवकरच नेपाळमध्ये विस्तार करणार आहोत. सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि डीलरशीपसाठी आमच्याकडे येत असलेली मागणीही वाढत आहे. येणाऱ्या काळातही दमदार उत्पादन श्रेणीच्या जोरावर चांगली विक्री होईल अशी खात्री आहे.’
वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. ही इलेक्ट्रिक दुचाकी (ईव्ही) क्षेत्रातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असून ती जॉय ई- बाइक्स ब्रँडच्या दुचाकींचे उत्पादन करते. बीएसईवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत कंपनी या नात्याने कंपनीने भारतीय ईव्ही क्षेत्राच्या संभाव्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या तत्वाशी सुसंगत राहात सध्याच्या वाहतूक व्यवस्थेला हरित पर्याय देण्यावर कंपनीचा भर आहे. जॉय ई- बाइक्सच्या माध्यमातून कंपनी नेहमीच्या इंधनांवर चालणाऱ्या बाइक्सना पर्याय उपलब्ध करून देत आहे. कंपनी देशभरातील 25 प्रमुख शहरांत कार्यरत असून ही संख्या आणखी वाढवण्याची योजना आहे