मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये पलकची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाने हाथ जोडून माफी मागितली त्यान्नातारही त्याला माफी न देता अटक केल्यानंतर त्याला चंडीगड कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची मिमिक्री करण्याच्या आरोपाखाली किकूला अटक करून, किकूविरोधात कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली .कॅथल पोलिसांनी आज सकाळीच कीकूला मुंबईत अटक केली. त्यानंतर त्याला चंदीगडमधील कोर्टात हजर केलं. कोर्टाने किकूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमध्ये किकूने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची मिमिक्री केल्याचा आरोप आहे दरम्यान, किकूने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. “जर माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल, तर मी हात जोडून माफी मागतो”, असं किकूने म्हटलं आहे.27 डिसेंबर रोजी प्रक्षेपित झालेल्या भागात पलकने ही नक्कल केली होती.दरम्यान,किकुच्या अटकेने कलाकारांच्या वर्तुळात खळबळ उडाली असून हि कॉमेडी प्रदर्शित करणाऱ्या कलर्स या वाहिनीवर कारवाई होणार काय ? या शो च्या निर्माता दिग्दर्षाकावारही कारवाई होवू शकते काय ? याबाबत खल होत आहेत
रझा मुराद यांच्याकडून निंदा –
अभिनेता रझा मुराद यांनी किकूच्या अटकेबद्दल निंदा व्यक्त केली आहे. जर किकूने माफी मागितली असेल, तर त्याला अटक का?, असा सवाल रझा मुराद यांनी विचारला आहे.याशिवाय कॉमेडीयननी संयम राखावा असंही, मुराद यांनी म्हटलं आहे.
कपिल शर्मा कडून संत गुरमीत राम रहीम यांना आवाहन
संत गुरमीत राम रहीम यांच्यातील मानवतेला माझे निवेदन आहे कि या प्रकरणी मिडिया समोर येवून , एक कलाकार जो खुशिया , आनंद वाटण्याचे काम करतो त्याच्या बाजूला उभे राहून त्याच्या मागे उभे राहून जगाला माणुसकीचे सुरेख दर्शन घडवून द्यावे. शांती आणि आनंदासाठी सारे मिळून काम करू यात असे कपिल शर्मा ने म्हटले आहे