सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांसोबत विभागीय आयुक्तांनी केली चर्चा

Date:

पुणे: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तडाॕ.दीपक म्हैसेकर यांनी आज सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर बैठक घेतली.
बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डाॕ.सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित होते.
डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच रुग्णसंख्येत भर पडू नये, यासाठी काही दिवस शहरातील गर्दीचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जनजागृती घडवण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद यावर भर देण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीमध्ये समन्वय आणि सुसूत्रता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रिया कमी कराव्यात, जेणेकरून
कोरोना बाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, बधिरीकरण तज्ञ व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देता येतील.
डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, खासगी रुग्णालयांनी अतिदक्षता विभागात कामाचे ज्ञान घेतलेल्या प्रशिक्षित परीचारकांच्या नावांची यादी प्रशासनाला सादर करावी. तसेच सध्याच्या परिस्थितीत केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियाच रुग्णालयात कराव्यात व खाटा उपलब्ध ठेवाव्यात, या कामी इंडियन मेडिकल असोसिएशनने समन्वयाची भूमिका पार पाडावी.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक सुभाष साळुंखे म्हणाले, सध्याची परिस्थिती नियंत्रणात असली तरी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करणे जरुरीचे आहे.
नवले हॉस्पिटल चे डॉ. डी. बी. कदम म्हणाले, रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी केली जात असून संशयित रुग्णांना नायडू रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग, पुरेशा खाटा राखीव ठेवणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर कार्यवाही आराखडा तयार ठेवायला हवा, असेही ते म्हणाले.
भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.संजय ललवाणी म्हणाले, रुग्णालयात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून अंतर्गत विविध विभागांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी आयएमए चे डॉ.संजय पाटील, ए एफ एम सी चे आर एम गुप्ता, डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध रुग्णालयांच्या प्रमुखांनी उपाययोजनांबद्दल माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला चतु:शृंगी देवी मंदिर परिसर

राष्ट्रीय कला अकादमी आणि श्री चतु:शृंगी देवी देवस्थानच्या संयुक्त...

कुपोषणमुक्त मुंबईसाठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा-– पालकमंत्री अँड. आशिष शेलार

मुंबई, दि. 12 नोव्हेंबर 2026ज्या पद्धतीने एस.आर..ए ने झोपडपट्टी...

मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवण्याची धमकी:धमकीचा ई-मेल मिळताच यंत्रणा अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

पुणे- महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी...