सनी लियोन करते आहे … पतीला बॉलीवूडचा स्टार
मुंबई-सनी लियोन चा पती आता हिंदी भाषा आणि नृत्याचे धडे गिरवत आहे तर अभिनयाचे मार्गदशन हि तो खुद्द सनी लियोन कडूनच घेतो आहे . सनी आणि तिचा पती डेनीअल आता या निमित्ताने बॉलीवूड मध्ये चर्चेचा विषय बनत आहेत अर्थात चांगल्या चर्चेचा . … अजून तरी …..
पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असे करिअर घडवणारी सनी लियॉनचा पती डेनिअल वेबरने आता ‘डेंजरस हुस्न’ या सिनेमा द्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. डेनिअल लवकरच ‘डेंजरस हुस्न’ सिनेमात झळकणार आहे.’डेंजरस हुस्न’ डेनिअलचा पहिला सोलो सिनेमा आहे. यापूर्वी तो सनी लिओनीच्या ‘जॅकपॉट’ सिनेमात कॅमियो भूमिकेत दिसला होता. डेनिअल ने नुकतेच डेंजरस हुस्न या रोमँटिक-हॉरर सिनेमाच्या पार्टी नंबर गाण्याच्या शूटिंग केले . विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रचंड प्रसिद्धी चित्रीकरणाच्या प्रारंभापासून म्हणजे मार्च च्या सुरुवातीपासूनच सुरु झाली आहे . सनी लियोन हे नाव आले कि प्रसिद्धी आलीच हे सूत्र त्यामागे आहे. ‘डेंजरस हुस्न’ चे फेसबुक वर पेज हि आहे त्यामधून तसेच यु ट्यूब वरून हि फोटो -चित्रीकरण सामायीचे व्हीडीवो क्लिप्स मुलाखती यांना बहर आला आहे
दिनेश शुक्लाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या या सिनेमात डेनिअल रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेशने सांगितले, ‘डेनिअल या सिनेमात गिटार वाजवणा-या म्यूझिशिअलच्या रुपात दिसणार आहे.’
विशेष म्हणजे, अभिनया क्षेत्रातून पदार्पण करणारा डेनिअल आपली पत्नी सनी लिओनीकडून टिप्स घेत आहे. डेनिअलच्या सांगण्यानुसार, ‘सनी दिवसभर माझ्या संपर्कात असते. ती मला कॅमेरा कसा फेस करायचा आणि चांगले हावभाव कसे द्यायचे याच्या टिप्स देत असते.’
डेनिअल सध्या हिंदी शिकत असून डान्स क्लासेससुध्दा ज्वॉइन केले आहेत. डेनिअलने सांगितले, ‘मी चांगला अभिनेता होण्याचा प्रयत्न करत आहे. मागील चार वर्षांपासून मुंबईमध्ये सनीचे काम सांभाळत होतो. मला याचे दु:ख आहे, की त्या काळात मी हिंदी शिकलो नाही. म्हणून आता दररोज सकाळी हिंदी शिकत आणि संध्याकाळी डान्स करतो.’