शिवसेनेला मुंबईतील मातोश्री नाही तर दिल्लीतील मातोश्री आदेश देतात, ठाकरेंवर फडणवींसांची जहरी टीका

Date:

मुंबई- शिवसेनेचे आदेश आता मातोश्रीवरून निघत नाही तर दिल्लीतल्या ‘मातोश्री’ आदेश देतात आणि ते सेनेवाले ऐकतात अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पालघरमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या प्रचारावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, “जनतेशी बेईमानी केलेले हे सरकार काही झाले तरी जास्त वेळ टिकणार नाही. शिवसेना ही सकाळी शेर तर संध्याकाळी ढेर होते. शिवसेनेची लोकसभेत आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोरावर मुख्यमंत्री बनवण्याचे वचन तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का? असा सवाल विचारावा लागतो. कारण आता ‘मातोश्री’वरुन नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, “पालघर जिल्ह्यामध्ये पाच वर्षात सातत्याने येण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पालघर जिल्हा 2014 मध्ये अस्तित्वात आला, पण पालघरच्या मतदारसंघांमध्ये 1960 नंतर सर्वात जास्त वेळा कोणी मुख्यमंत्री आला असेल, तर तो मी होतो”, असा दावा फडणवीसांनी केला. “पाच वर्षे सातत्याने येऊन पालघरच्या समस्या घेतल्या, विविध घटकांपर्यंत आपल्याला कसे पोहचता येईल, सरकारच्या योजना कशा पोचवता येईल याचा प्रयत्न केला. आपल्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्रचंड यश मिळाले होते, पण विरोधी पक्षनेता म्हणून निवडून आलो”, असेही फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ”शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे वचन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिले होते. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जीवावर करणार असे वचन दिले होत का? शिवसेनेच्या या वागण्यामुळे बाळासाहेबांना स्वर्गात खूप वाईट वाटत असेल. हिंदुत्ववादी शिवसेनेची आता काय अवस्था झाली आहे हे सगळ्यांना माहित आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ मुंबई, दि. ११...

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ

MPSC च्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही, ऑफलाईन...

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीत

तेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतपुणे: डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा...

वडकी नाला व कदमवाकवस्ती येथे दिंडीप्रमुखांचा सत्कार; वारकऱ्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वारीच्या वाटेवर भक्तीचा विसावा; माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्यांचे ‘पीएमआरडीए’कडून भावपूर्ण...