रोजच्या धकाधकीच्या जीवनातमहोत्सव नागरिकांसाठी पर्वणीच-आ.माधुरी मिसाळ
पुणे-क्रीएटीव्ह फौंडेशन व कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने कोथरूड च्या छ.शिवाजी पुतळा
चौकात भव्य शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.दि.८ फे.ला सुरु झालेल्या महोत्सवात
७ दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची सांगता झाली.दररोज हजारो कोथरूडकरांनी कीर्तनाचा आनंद लुटला.
यात प्रमुख्याने संत नामदेवांचे १७वे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास,महामंडलेश्वर अमृतदास महाराज,
छगन महाराज खडके(प्रती इंदोरिकर) रामचंद्र देखणे महाराज,बाल कीर्तनकार नागवे महाराज,यांच्या कीर्तनाने
कोथरूडकर भक्तिरसात चिंब न्हाले.
महोत्सवाच्या आठव्या दिवशी फक्त महिलांसाठी भव्य लकी ड्रा चे आयोजन करण्यात आले होते.
लकी ड्रा चे वितरण करण्यासाठी माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार,आ.माधुरी मिसाळ,आ.योगेश टिळेकर,
आ.जगदीश मुळीक्,कॉंग्रेस चे शहराध्यक्ष अभय छाजेड,उत्तम भेलके,जगन्नाथ कुलकर्णी व इतर मान्यवर
उपस्थित होते.यावेळी सुमारे ३००० महिलांनी गर्दी केली होती,लावण्या किवा नृत्याच्या इतर कार्यक्रमा बरोबरच कीर्तन महोत्सवाला मिळालेला प्रतीसाद कोथरूड च्या संस्कृतिक परंपरेला साजेसा असल्याचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले.तर माधुरी ताई मिसाळ यांनी या महोत्सवाचे कौतुक करताना”रोजच्याधकाधकीच्या जीवनात महिलांना विरंगुळ्याचे चार क्षण या महोत्सवामुळे मिळतात,हे वाखाणण्याजोगे आहे,या लकी ड्रा द्वारे
अनेकांचे स्वप्न साकार झाले,कोणाला पैठणी मिळाल्याचा आनंद तर फ्रीज मिळविलेल्या राठोड वहिनींच्या आनंदाने पाणावलेल्या डोळ्यात स्वप्न साकारल्याचे दिसून येत होते.या सर्वच कार्यक्रमातून नागरिकांना मिळणारा आनंद अवर्णनीय असल्याचे ही त्यांनी नमूद केले.चांगल्या कामाची पावती नागरिक देतच असतात असे नमूद करताना आ.जगदीश मुळीक् यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी काढलेल्या लकी ड्रा मधे पहिल्या क्रमांकाचे फ्रीज चे बक्षीस ज्योती राज राठोड,दुसर्या क्रमांकाचे सोफा कम बेड सौ.अनीता सुहास नावरकर,तिसरया क्रमांकाचे होम थियेटर रेवती कुलकर्णी,चौथ्या क्रमांकाचे सिंगल बेड+गादी सौ.प्रतिक्षा अमृतकर यांना,पाचव्या क्रमांकाचे सी.डी.प्लेयर सीमा हुंबे,यांना मिळाले.याव्यतिरिक्त ११ पैठण्या व अन्य बक्षिसांची महिलांनी लयलूट केली.संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले तर विशाल भेलके,उमेश भेलके,यांनी स्वागत/सत्कार,तर सौ.मन्जुश्री खर्डेकर,सौ.श्वेताली भेलके यांनी संयोजन केले.
या संपूर्ण महोत्सवाचे संयोजन संदीप खर्डेकर,विशाल भेलके आणि उमेश भेलके यांनी केले