मुंबई:
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे अभिष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. 19 एप्रिल 2015 रोजी सायंकाळी पाच वाजता आंगण मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार डेपोजवळ, चेंबूर येथे हा मेळावा होईल,अशी माहिती प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली
या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, कार्यक्रमाच्या उद्घाटक पंकजा मुंडे (महिला व बालकल्याण मंत्री), रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे, ज्येष्ठ नेते अनिल अण्णा गोटेे, एकनाथ खडसे, विनोद तावडेे, सुभाष देसाई, चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, प्रकाश मेहता, राम शिंदे, विजयबापू शिवतारे, रासप आ.राहुल कुल, सुजितसिंह ठाकूर, नारायण पाटील, तानाजी सावंत, रत्नाकर गुट्टे, पुंडलिक काळे, शेखर गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत राहणार आहेत.