पुणे :
महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटीमध्ये योग दिनी २०० विद्यार्थी -विद्यार्थिनीचा सहभाग
: पुण्यातील महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये २१ जून रोजी ‘ आंतरराष्ट्रीय योग दिवस ‘ साजरा करण्यात आला
आझम स्पोर्ट्स एकेडमी ,एंग्लो उर्दू बॉयज हायस्कूल ,एंग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल ,अबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज ,अबेदा इनामदार सिनियर कॉलेज ,इंग्लिश प्रायमरी स्कूल ,तय्यबिया ऑर्फनेज या शैक्षणिक संस्था चे २०० विद्यार्थी -विद्यार्थिनी योगासन करून सहभागी झाले
संस्थेचे अध्यक्ष पी ए इनामदार उपस्थित होते . स्पोर्ट्स डायरेक्टर गुलझार शेख ,मजीद सय्यद ,शबनम पिरझादे यांनी योगासनासाठी मार्गदर्शन केले